श्रीगोंदे : नागवडे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर (keshav magar) यांनी पदाचा पाच महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला होता. हा राजीनामा काही दिवसांपूर्वी संचालक मंडळाने मंजूर केला. कारखान्याची निवडणूक कोरोना संकटामुळे लांबल्याने, या पदासाठी अनेक नावे चर्चेत असून, रस्सीखेच सुरू झाली आहे. (Magar approves resignation of Nagwade factory vice president)
दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांचे विश्वासू सहकारी राहिलेल्या मगर यांनी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे (Rajendra Nagavade) यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करीत पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा देऊन पाच महिने झाले, तरीही तो मंजूर केला नव्हता. अध्यक्ष व उपाध्यक्षांमधील वाद मिटण्याऐवजी टोकाला गेल्याने, शेवटी नागवडे यांनी संचालकांच्या मागणीनुसार राजीनामा मंजूर केला.
कारखाना निवडणूक कधी लागते, हे सांगता येत नसल्याने, ही जागा रिक्त ठेवणार की उपाध्यक्ष निवडला जाणार, यावरून चर्चा आहे. सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, कारखान्याने उपाध्यक्ष निवडीची बैठक घेण्याची मागणी केल्याचे समजते.
माजी उपाध्यक्ष सुभाष शिंदे, राजू पाटील जगताप, अरुण पाचपुते, ऍड. सुनील भोस व अंजली रोडे यांच्यापैकी एकाला उपाध्यक्षपदी संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. ही निवडप्रक्रिया लवकरच होण्याची शक्यता आहे.(Magar approves resignation of Nagwade factory vice president)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.