राहुरी : राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची अक्षरशः चेष्टा चालवली आहे. कारण निम्मं शैक्षणिक वर्ष संपलं तरी त्यांना अद्याप गणवेश मिळालेले नाहीत. तसंच आत्ता हे गणवेश वाटपाला सुरुवात झाली तर त्यांची अवस्था बघून चीड आल्याशिवाय राहणार नाही. काहींना ते ढगळे, काहींना लहान, काहींना फाटके तर काहींना तिरप्या खिशांचे गणवेश मिळाले आहेत. काही विद्यार्थ्यांना तर तेही मिळालेच नाहीत.
Maharashtra School Uniform Latest News