…तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही; कर्जतच्या युवकाचा निर्धार

Nitin Toradmal
Nitin ToradmalSakal
Updated on

कर्जत (जि. नगर) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलन झाले. त्यामध्ये मराठा युवकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे जोपर्यंत सरकार मागे घेत नाही, तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार एका युवकाने केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी लढलेल्या आणि दाखल झालेले गुन्हे हा मुद्दा पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आला आहे. याबाबत सकल मराठा समाजाचे समन्वयक ॲड. धनराज रानमाळ यांनी माहिती दिली.

नितीन तोरडमल (वय ३०, रा. बहिरोबावाडी, ता. कर्जत) असे या तरुणाचे नाव आहे. नितीन तोरडमल यांनी सकाळला सांगितले की, मागील चार- पाच वर्षात राज्यातील सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध आंदोलने राज्यात केली आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजाच्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, युवक व कार्यकर्त्यांवर शासनाने मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल केले आहेत. ते सर्व गुन्हे कोर्टात न्यायप्रविष्ट असून अनेकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने त्यांना शिक्षण, नोकरी व व्यवसायात अडचण येत आहे. सरकारने अनेकवेळा मराठा अंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत घोषणा केली. मात्र, ती हवेत वीरली. त्यावर ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक गुन्हे प्रलंबित आहेत. पाठपुरावा करूनही त्यावर तोडगा निघत नाही. तो पर्यंत पायात चप्पल घालणार नसल्याचे नितीन तोरडमल यांनी सांगितले.

Nitin Toradmal
भंडारदऱ्याकडे जाणाऱ्या वाहतूकीत बदल, पर्यटकांची होणार झाडाझडती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()