Manoj Jarange: स्वागतासाठी पाथर्डी सज्ज! मनोज जरांगे आज अहमदनगर दाखल होणार, या मार्गावरील वाहतूक बंद

मनोज जरांगे यांच्या पदयात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या पदयात्रेच्या मार्गाची पाहणी आज जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी करत पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
Manoj Jarange: स्वागतासाठी पाथर्डी सज्ज! मनोज जरांगे आज अहमदनगर दाखल होणार, या मार्गावरील वाहतूक बंद
Updated on

Manoj Jarange in Pathardi Ahmednagar: मनोज जरांगे यांच्या पदयात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या पदयात्रेच्या मार्गाची पाहणी आज जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी करत पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या यात्रेचे स्वागत आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले व प्रताप ढाकणे करणार आहेत.

रविवारी (ता. २१) सकाळी जरांगे यांची पदयात्रा तालुक्यातील मिडसांगवी येथे येणार आहे. या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यात्रेत सहभागी झालेल्या आंदोलकांना नाश्ता देण्यासाठी चार टन पोहे बनवण्यात येणार आहेत.

पदयात्रेची भोजन व्यवस्था तालुक्यातील आगासखांड शिवारात आणि फुंदेटाकळी शिवारात करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन ठिकाणची ७५ एकर शेतजमीन सपाट करण्यात आली आहे. या ठिकाणी असलेल्या मैदानाच्या बाहेर स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉलमध्ये विविध गावांतून नागरिक भोजन घेऊन थांबणार आहेत. (Latest Marathi News)

साधारणतः दहा लाख आंदोलक या ठिकाणी भोजन करतील असा अंदाज आहे. त्यानुसार भोजन व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील अनेक गावांतून नागरिक भाकरी, चटणी, लापशी, कढी, मसाला भात घेऊन येणार आहेत. प्रत्येक गावातून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुद्धा मागवण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे, त्या ठिकाणी दोन टन पिठले बनवण्यात येणार आहे. एकादशी असल्याने साबुदाणा खिचडी सुद्धा बनवण्यात येणार आहे. भोजन व्यवस्थेचे काम दहा हजार स्वयंसेवक पाहणार आहेत. आगासखांड शिवारात लाऊडस्पिकरची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी जरांगे यांनी जमलेल्या सर्वांशी संवाद साधावा, असा आग्रह त्यांना केला जाणार आहे.

Manoj Jarange: स्वागतासाठी पाथर्डी सज्ज! मनोज जरांगे आज अहमदनगर दाखल होणार, या मार्गावरील वाहतूक बंद
Sania Mirza Shoaib Malik : नव्या प्रवासासाठी... सानियाची शोएबच्या तिसऱ्या निकाहवर आली प्रतिक्रिया

कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू

आजच नगर जिल्ह्यातील काही कार्यकर्ते या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक गावातून आजच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या भोजन ठिकाणी अनेकांनी पाठवून दिल्या आहेत. पदयात्रा मार्गावरील सर्वच गावात जरांगे यांच्या स्वागतासाठी कमानी लावण्यात आल्या आहेत. संपूर्ण मिरवणूक मार्गावर भगवे ध्वज उभारण्यात आले आहेत. सकाळी पाथर्डी शहरात या यात्रेचे स्वागत दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या जवळ करण्यात येणार आहे. या ठिकाणापासून ते बाबुजी आव्हाड महाविद्यालयापर्यंत जरांगे यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

पाथर्डी ते मिडसांगवी वाहतूक बंद

उद्या पाथर्डी ते मिडसांगवी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही यात्रा व्यवस्थित पार पडावी, यासाठी दोनशे पन्नास पोलिस कर्मचारी, तीस अधिकारी, एसआरपीच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आज दुपारी ओला यांनी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक निरीक्षक रामेश्वर कायंदे यांच्या उपस्थिती पदयात्रा मार्गाची पाहणी केली. प्रताप ढाकणे यांनी आपल्या वतीने आंदोलकांना भोजन व पाण्याची व्यवस्था केली आहे.

Manoj Jarange: स्वागतासाठी पाथर्डी सज्ज! मनोज जरांगे आज अहमदनगर दाखल होणार, या मार्गावरील वाहतूक बंद
PM Modi Ram Setu Visit: प्रभू रामाने जिथे ‘राम सेतू’ बांधला तिथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पूजा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.