सभासद,कामगारांची दिवाळी गोड करणार : राजेंद्र नागवडे

राजेंद्र नागवडे; नागवडे कारखाना सर्वसाधारण सभा
Nagar
NagarSakal
Updated on

श्रीगोंदे : राज्यात पहिल्या तीन मध्ये कसे येता येईल, यासाठी नागवडे साखर कारखाना प्रशासन प्रयत्न करीत आहे. एफआरपीप्रमाणे आठ ते दहा दिवसांत ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पेमेंट वर्ग करून सभासद व कामगारांची दिवाळी गोड करणार, अशी ग्वाही नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.

कारखान्याच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. नागवडे म्हणाले, की काही मंडळी म्हणतात साखर कमी भावात विकली; पण तसे काहीच झालेले नाही. वेळेनुसार काही निर्णय घ्यावे लागतात.

आमदार बबनराव पाचपुते म्हणाले, ‘‘नागवडे साखर कारखान्याची डिस्टिलरी, सह वीजनिर्मिती प्रकल्प सक्षमपणे चालविणे आवश्यक आहे, तरच उसाला चांगला भाव देऊन कारखान्यावरील कर्जाचा बोजा कमी करता येईल. सत्ताधाऱ्यांनी यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे.’’

घनश्याम शेलार म्हणाले की, कुकडी घोड पाण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल, तरच पाणी प्रश्न सुटेल.

Nagar
अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव विविध उपक्रमांनी सुरू

केशवराव मगर, आण्णासाहेब शेलार, दीपक भोसले, संदीप नागवडे, प्रशांत दरेकर बाबासाहेब भोयटे, महेश तावरे, धर्मनाथ काकडे, योगेश भोयटे, हनुमंत झिटे, निळकंठ जंगले, संतोष गुंड, हरिश्चंद्र धांडे, श्रीपाद खिस्ती, बाळासाहेब मगर, गणपत फराटे यांनी चर्चेत भाग घेतला.

प्रास्ताविक सुभाष शिंदे यांनी केले. अहवालवाचन कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी केले. हेमंत नलगे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.