Radhakrishna Vikhe: 'लबाड लांडगं ढोंग करतंय' विखेंचा बाळासाहेब थोरातांना टोला; गणेशची निवडणूक तापली

Radhakrishna Vikhe
Radhakrishna Vikheesakal
Updated on

शिर्डी: ज्यांनी गणेश कारखान्‍याला जिल्‍हा सहकारी बँकेतून कर्ज देण्‍यास विरोध केला आणि ऊस पळविला, त्यांचा गणेशची निवडणूक लढविण्याचा हेतू तरी प्रामाणिक आहे का? त्यांना सभासदांची नव्‍हे, तर स्‍वत:च्‍या राजकारणाची चिंता आहे.

कोपरगाव, संगमनेरात झाली नाहीत अशी विकासकामे आता राहाता तालुक्‍यात होत आहेत. त्यामुळे व्यक्तिद्वेषातून एकत्र आलेल्या विरोधकांची अवस्था लबाड लांडगं ढोंग करतंय अशी झाली आहे.

Radhakrishna Vikhe
Lok Sabha 2024: काँग्रेसला सलग दोन वेळा अपयश आलं, ही जागा 'राष्ट्रवादी'ने लढवावी; पवारांसमोर पदाधिकाऱ्यांची मागणी

अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व युवा नेते विवेक कोल्हे यांचे नाव न घेता केली. गणेश कारखान्याच्या निवडणूक प्रचाराची सांगता व त्यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील होते.

यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, शिवसेनेचे जिल्‍हा प्रमुख कमलाकर काते, नितीन कापसे, शिवाजी धुमाळ, ज्ञानेश्‍वर गोंदकर, दीपक पठारे, ॲड. श्रीराम गणपुले, सं‍जीव भोर, मुकुंद सदाफळ, प्रताप जगताप, डॉ. भास्‍करराव खर्डे, दत्‍ता कोते, साहेबराव निधाने, संदीप देशमुख यावेळी उपस्थित होते.

विखे पाटील म्‍हणाले, की विरोधक गणेश नेमका कोल्हे चालविणार की थोरात, हे सांगत नाहीत. मागील आठ वर्षांत प्रवरा कारखान्‍याने गणेशच्‍या सभासदांसह कामगारांची देणी दिली. कोल्‍हे पॅटर्नच्‍या नावाखाली तुम्‍ही केवळ फसवणूक केली. त्यांना केवळ अकरा गावांत रस आहे.

त्यांच्या काळातील संचालक मंडळाला गैरकारभाचे प्रायश्चित्त भोगावे लागेल. निळवंड्याचे श्रेय घेणाऱ्यांनीच मंत्री असताना समन्‍यायी पाणीवाटप कायद्याचे विधेयक मांडले. यावेळी म्हस्के, लोखंडे, मोहनराव सदाफळ, दीपक पठारे, संदीप देशमुख, नितीन कापसे, संजीव भोर, कमलाकर कोते, राजेंद्र गोंदकर यांची भाषणे झाली.

Radhakrishna Vikhe
Lok Sabha 2024: लोकसभेच्या जागा वाटपाबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय! नाना पटोलेंनी दिल्लीत घेतल्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी

गणेशची निवडणूक माणुसकीची, विश्‍वासाची आणि त्यागाची आहे. या कारखान्‍याच्‍या यशस्वितेसाठी डॉ. विखे पाटील कारखान्‍याच्‍या सभासदांनी केलेला त्‍याग गणेशच्‍या सभासदांनी लक्षात घ्‍यावा.

आम्‍ही या भागातील शेतकऱ्यांच्‍या पाठीशी उभे राहिलो, याला महत्त्व आहे. आज या निवडणुकीच्‍या निमित्‍ताने ज्‍या अदृश्य हातांची मदत होत आहे, त्‍यांचे कल्‍याण होईल. मात्र, काही अदृश्य हातांचे काय करायचे, हे येणारा भविष्‍य काळच ठरवेल.

- डॉ. सुजय विखे पाटील, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.