कोपरगाव : पाणी असूनही वर्षभर पाणीटंचाईच्या(Water scarcity) झळा सोसत असलेल्या कोपरगावकरांना(kopergaon people) आज 123 कोटी रूपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेची अनोखी भेट मिळाली. पाणी टंचाईतून मुक्त होण्याचे शहरवासियांचे स्वप्न आणि वचनपूर्ती करण्याचे आपले स्वप्न, साकार होण्याचा मार्ग मोकळा झालाय. आज राज्य सरकारच्या प्रकल्प मान्यता समितीने या योजनेस मान्यता दिली, अशी माहिती आमदार आशुतोष काळे (mla ashutosh kale)यांनी दिली.काळे म्हणाले, आज नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक व सहसचिव पांडूरंग जाधव, पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम जाधव व जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिका-यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत या योजनेस मान्यता मिळाली.
वितरण व्यवस्थेतील त्रुटी, साठवण क्षमतेच्या मर्यादा आदी अनेक अडचणींमुळे शहरवासियांना पाणी असूनही पाणी टंचाई सोसावी लागते. ती आता कायमची दूर होईल.गेल्या विधानसभा निवडणुकीत आपण पाणीटंचाई दूर करण्याचे वचन दिले होते, त्याची पूर्तता सुरू झाली. आपण पुढाकार घेऊन, पाच क्रमांकाच्या साठवण तळ्याची समृध्दी महामार्गाच्या ठेकेदार कंपनीकडून खोदाई सुरू केली. त्यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेतला. जवळपास पंधरा कोटी रूपये खर्चाच्या खोदाईचे काम यापूर्वीच पूर्ण झाले.याबाबत माहिती देताना मुख्याधिकारी शांताराम गोसावी म्हणाले, प्रकल्प मान्यता समितीने या योजनेस मान्यता दिल्याने आता निविदा जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला.
योजनेची वैशिष्ट्ये
१२३ कोटी रूपये खर्चाची ही पाणीयोजना चालविण्यासाठी सौर उर्जेचा वापर केला जाईल.
एका अर्थाने ही योजना ऊर्जावापराच्या दृष्टीने आत्मनिर्भर असेल.
सोळा एकरातील पाच क्रमांकाच्या साठवण तळ्याला काॅंक्रीटीकरण तर उर्वरीत तळ्यात प्लॅस्टीक कागद अंथरूण पाण्याची गळती रोखली जाईल.
शहरातील गोरोबानगर, संजयनगर व बेट या भागात प्रत्येकी दोन ते सव्वा दोन लाख लिटर क्षमतेचे तसेच ब्रीजलाल नगरमध्ये चार लाख लिटर साठणक्षमतेचा जलकुंभ उभारला जाईल.
आवश्यक तेथे नव्या जलवाहिन्याचा टाकल्या जातील.
शहराला दररोज मुबलक पाणीपुरवठा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.