ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी : आमदार पाचपुते

MLA babanrao pachpute \
MLA babanrao pachpute \esakal
Updated on

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : उद्धव ठाकरे सरकारच्या शेतकरीद्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून, शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अन्यथा जनतेची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी आमदार बबनराव पाचपुते यांनी केली.

पाचपुते म्हणाले, की राज्यातील ५५ लाख हेक्टर शेतातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात शंभर लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत. शिवाय पुरामुळे शेतजमिनी नापिक झाल्या आहेत. जमिनींचा कस संपल्यामुळे पुढील दहा वर्षे तरी कोणत्याही पिकाची शाश्वती राहिलेली नसताना ठाकरे सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱ्याची थट्टा करत आहे. जाहीर केलेल्या मदतीपैकी फुटकी कवडीदेखील शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नसल्याने राज्यातील शेतकरी नैराश्यग्रस्त झाला असून, आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याने, ठाकरे सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे.

MLA babanrao pachpute \
अहमदनगर महापालिकेतील मुख्य लेखाधिकारी लाचेच्या सापळ्यात

या दुःखामुळे हजारो शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात जाणार असून, मातोश्री, वर्षा आणि मंत्रालय मात्र रोषणाईने उजळणार आहे. ठाकरे सरकारला जरादेखील लाज असेल, तर यंदाची दिवाळी शेतकऱ्याच्या दुःखाची दिवाळी म्हणून जाहीर करून मातोश्री व वर्षावर रोषणाई न करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, असे ते म्हणाले.

महिनाअखेरीपर्यंत शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या २८ लाख पूर्वसूचना दाखल केल्या होत्या. त्यामध्ये आता आणखी काही लाख सूचनांची भर पडली आहे. शेतकऱ्यास वाऱ्यावर सोडणार नाही, असे पोकळ आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांना दिलेल्या ९७३ कोटींच्या रकमेपैकी शेतकऱ्याच्या हातात फुटकी कवडीदेखील पडलेली नाही, याची सरकारला शरम वाटत नाही का, असा सवालही पाचपुते यांनी केला.

MLA babanrao pachpute \
शिर्डीत विमानसेवा पुन्हा सुरळीत; लवकरच ३२ विमानफेऱ्या होणार सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.