गाव आदर्श करायचं तर तोंडात साखर, डोक्यावर बर्फ हवा!

political
politicalesakal
Updated on
Summary

नगर जिल्ह्यात दहा आमदार तसेच दोन खासदार आहेत. त्यांनी प्रत्येकी एक गाव दत्तक घेतले. ते आदर्श केले. तर रोलमॉडल म्हणून ही गावं राज्यापुढे येऊ शकतात. जर मंत्री सत्तार हे एक गाव दत्तक घेत असतील तर आपल्या आमदारांनी आणि खासदारांनीही तसे करायला हवे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी आपल्या गावाचं नाव केवळ जिल्ह्यातच नव्हे तर देशात गाजवलं. राज्यच काय देश पातळीवरही या दोन गावांची नेहमीच दखल घेतली जाते. या दोन गावांपाठोपाठ नगरपासून पंधरावीस किलोमीटर अंतरावर असलेले ऐतिहासिक वारसा लाभलेलं छोटंस पारगाव भातुडी गावही आदर्श होण्याच्या मार्गावर आहे. खरंतर हे गाव शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी दत्तक घेतले आहे. मंत्र्यांनीच गाव दत्तक घेतले आहे म्हटल्यावर गावाचा विकास आता लांब नाही असा विश्वास ग्रामस्थांनी बाळगणे काही गैर नाही.

व्याख्याते गणेश शिंदे हे या गावचे सुपुत्र. शिंदे यांचे नाव आता महाराष्ट्राला परिचित आहे. त्यांचे या युवकाने गावकऱ्यांना संघटित करून गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार केला आहे, त्याचे कौतुक केले पाहिजे. वास्तविक शिंदे फॅमिलीकडे काही कमी नाही. गाडीघोडा, बंगला सगळं आहे. पुण्यात वास्तवास असलेल्या गणेश शिंदेना काही कमी नाही. पण, गावच्या विकासासासाठी त्यांना झपाडलं. ते जेथे जातात तेथे ते गावच्या शिवारमातीवर बोलतात. गावांसाठी तरूणांनी काय केले पाहिजे हे सांगतात. आपल्या व्याख्यानात संताच्या कार्याची ओळख करून देतात.

गाव कात टाकणार

पुण्यात शिकत असताना या युवकाला आपल्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटत असे. पुढे गावची निवडणूकही लढविली पण, साध्य झाले नाही. आज मात्र गावात शिंदे यांच्या नेतृत्वाखालीत पूर्ण पॅनेल निवडून आले आहेत. आज गावात नवीन ग्रामपंचायतीची इमारत, स्मशानभूमी, रस्ते, मुलांसाठी गार्डन, पाण्याची सोय आदी भरपूर कामे सुरू होत आहे. पुढील दोनतीन वर्षात गावानं कात टाकलेली दिसेल. या सगळ्या मध्ये सरपंच मीनाक्षी शिंदे उपसरपंच ताराबाई भोसले ग्रामपंचायत सदस्य प्रशांत शिंदे , सुप्रिया शिंदे, गणेश गुंड, महेश शिंदे, छोटू भाई शेख, दादू जगताप तसेच ग्रामसेवक सचिन पवार, बाळासाहेब चव्हाण, प्रसाद पवार, बाळासाहेब शिंदे. तसेच गावातील सर्व तरुणांबरोबरच महिलांचेही विशेष सहकार्य लाभते.

गावकऱ्यांची एकजूट

मध्यंतरी या गावाला भेट देण्याची संधी मिळाली. त्यावेळी गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसांडून वाहत होता. गावासाठी आपण काही तरी केले पाहिजे ही भावना प्रत्येकामध्ये दिसून येत होती. राज्यात अनेक गावे आदर्श बनली. आरआरआबांनी सुरू केलेल्या ग्रामस्वच्छता अभियानामुळे गावांचे चेहरे मोहरे बललले. शेकडो तरूण व्यसनापासून परावृत्त झाले. अनेक गावात दारूबंदी आली होती आणि महिलांचा त्याकामी पुढाकार होता हे विशेष. या गावाकडे पाहिले एकनाएक दिवस गाव बदलेलं दिसेल असे वाटले.

political
श्रीगोंदे : 'त्या' भोंदुबाबांचा पोलिसांनी केला पर्दाफाश!

बाहेरचा नेता गाव दत्तक घेतो

येथे मुद्दा असा आहे, की बाहेरचा नेता जिल्ह्यात येऊन एक गाव दत्तक घेतो. आपल्याकडे तर दहा आमदार आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गाव त्यांना सारखंच असलं तरी एखादं गाव असतं की त्या गावाचा विकास कोसो मैल दूर असतो. असं एखाद गाव प्रत्येक आमदारांनी आणि खासदारांनी दत्तक घ्यायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये प्रत्येक खासदारांना एक गाव दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. शेकडो खासदारांनी गावं दत्तक घेतली पण, त्याचे पुढे काय झाले हे माहित नाही. पण, गाव दत्त्तक घेण्याची मोदी यांची कल्पना स्वागतार्हच होती.

मंत्री सत्तारांचे स्वागत

कदाचित एखाद्या आमदार किंवा खासदारांनी तसे गाव दत्तक घेतले असेल तर त्याचे स्वागतच आहे. नसेल घेतले तर गाव दत्तक घ्यायला काही हरकत नाही. आपण घेतलेलं गाव सुंदर आहे. आपण आमदार, खासदार म्हणून केलेल्या कामाचा आनंद दुसरी कोणतीच गोष्ट मिळवून देणार नाही असे वाटते.

political
नगर : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; 4 जणांना मुदतवाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()