Mula Dam:'मुळा धरणातून पाणी जाऊ देणार नाही नाहीतर..'; आमदार तनपुरेंचा तीव्र इशारा

मुळा धरणातून पाणी जाऊ देणार नाही. त्यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
MLA Prajakt Tanpure on Mula Dam Water
MLA Prajakt Tanpure on Mula Dam WaterEsakal
Updated on

MLA Prajakt Tanpure on Mula Dam Water: समन्यायी पाणीवाटप कायदा मुळा धरणाच्या मुळावर उठला आहे. कायद्याचे पुनर्विलोकन व्हावे. जायकवाडीला पाणी सोडणे म्हणजे पाण्याचा अपव्यय आहे. शासनाने निर्णय रद्द करावा. मुळा धरणातून पाणी जाऊ देणार नाही. त्यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

राहुरी येथे आज (मंगळवारी) तहसीलदार चंद्रजीत राजपूत, मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना निवेदन दिल्यावर आमदार तनपुरे बोलत होते. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, मुळा पाटबंधारेचे उपअभियंता विलास पाटील, बाबासाहेब भिटे, विलास शिरसाठ, आदिनाथ तनपुरे, दिलीप इंगळे, विजय कातोरे, अप्पासाहेब ढूस, बाळासाहेब खुळे उपस्थित होते.

तनपुरे म्हणाले, की समन्यायी कायदा विषमन्यायी ठरला आहे. राहुरी तालुक्यात यंदा सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाला. दुष्काळसदृश परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या मागण्या सुरू झाल्या आहेत, अशा परिस्थितीत मुळा धरणातून दोन टीएमसी पाणी सोडले, तर ५० टक्केच पाणी पोहोचणार आहे. पाण्याची नासाडी होणार आहे. त्याचा फटका बसून, राहुरी तालुक्यात मोठा दुष्काळ निर्माण होईल. वास्तविक, जायकवाडीचे आठ, तर मुळा धरणातून तीन आवर्तने होतात. जायकवाडीतून रब्बीचे दुसरे आवर्तन सुरू आहे. मुळा धरणातून रब्बीच्या पहिल्या आवर्तनाचे नियोजन अद्याप झालेले नाही. जायकवाडीच्या बॅक वॉटरमध्ये हजारो अनधिकृत विद्युतपंप आकडे टाकून तीन-चार टीएमसी पाणी उपसा करीत आहेत.

आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की, " आमच्या हक्काचे पाणी जायकवाडीच्या अनधिकृत पाणीउपसा व दारूच्या कारखान्यांना वापरले जाणार आहे. राहुरी तालुका दुष्काळात होरपळणार आहे. त्यामुळे समन्यायी पाणीवाटपाची तत्त्व लागू होत नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांची भावना भावनाहीन सरकारला पोहोचविण्याचे काम केले आहे. यावर जनआंदोलन उभारले जाईल." (Latest Marathi News)

MLA Prajakt Tanpure on Mula Dam Water
नोटबंदीचा गाजावाजा करणाऱ्या मोदी सरकारला खरंच यश मिळाले का? काळा पैसा आणि कॅशलेस व्यवहाराचा लेखाजोखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.