शिंदेची हार; सब कुछ रोहित पवार

आमदार रोहित पवार यांची कर्जत-जामखेडमध्ये विजयी घोडदौड सुरूच
कर्जतच्या रणांगणात पुन्हा
कर्जतच्या रणांगणात पुन्हा sakal media
Updated on

कर्जत, ता. १९ : आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांची कर्जत-जामखेडमध्ये विजयी घोडदौड सुरूच आहे. येथील नगरपंचायतीत त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी(NCP) व काँग्रेस आघाडीने सतरापैकी पंधरा जागा मिळवीत भाजपच्या हातून सत्ता खेचून आणली. याद्वारे पवार यांनी भाजपच्या ताब्‍यातील सर्व सत्तास्थाने खालसा केली. २०१९ मध्ये भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात माजी मंत्री राम शिंदे(Ram Shinde)यांना धूळ चारीत रोहित पवार आमदार म्हणून निवडून आले. भाजपच्या(BJP) ताब्यातील व राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नसलेली येथील नगरपंचायतही आपल्याकडे खेचून आणली. एकूण १७ पैकी तब्बल १५ जागांवर विजय मिळविण्यात त्यांना यश आले. राष्ट्रवादीला १२, तर काँग्रेसला ३ जागांवर विजय मिळाला.

कर्जतच्या रणांगणात पुन्हा
कर्जतमध्ये रोहित पवारांची बाजी, राम शिंदेंना मोठा धक्का

माजी मंत्री राम शिंदे यांनी केलेल्या दहशतीच्या आरोपांना झुगारून कर्जतकरांनी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.मागच्या वेळी कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची अवस्था अत्यंत बिकट होती. मात्र, आमदार रोहित पवार यांनी गेली २ वर्षे अनेक विकासकामे मतदारसंघात केली. मागचे दोन महिने प्रचारात सर्वस्व झोकून दिले होते. पहिल्यांदाच कर्जतकरांनी अनोखा प्रचार अनुभवला. गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे हेदेखील प्रचारासाठी आले होते. भाजपच्या वतीने माजी खासदार किरीट सोमय्या, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना प्रचारासाठी बोलाविले होते. मात्र, मतदारांनी राष्ट्रवादी-काँग्रेसला संधी दिली.

कर्जतच्या रणांगणात पुन्हा
कर्जतमध्ये रोहित पवारांची बाजी, राम शिंदेंना मोठा धक्का

पवार यांनी व्हिडिओ व्हॅनच्या माध्यमातून विकासकांमाबद्दलची इत्थंभूत माहिती मतदारांपर्यंत पोचविली. सप्तसूत्रीच्या माध्यमातून जनतेला विकासाभिमुख दृष्टिकोन कसा असतो हेदेखील प्रचारातून दाखविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यांनी कर्जत शहरातील सर्वच प्रभागांतील नागरिकांच्या भेटी घेतल्या. प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्यासाठी नगरपंचायतीची सूत्रे आमच्या हातात द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले होते. विरोधकांनी आमदार रोहित पवारांवर विविध प्रकारे टीका करून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर अनेक खोटेनाटे आरोपही केले. मात्र, या सर्व राजकीय कांगाव्याला झुगारून कर्जतच्या जनतेने आपले मत विकासाला व कर्जतच्या भविष्याला देऊन विकासाची सूत्रे आमदार रोहित पवारांकडे सुपूर्द केली.

जायंट किलर पाटील

या निवडणुकीत प्रभाग सातमधील राष्ट्रवादीचे सतीश पाटील हे जायंट किलर ठरले. त्यांनी अटीतटीच्या लढतीत सफाईदार विजय मिळविला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.