Ahmednagar News : विधानसभेला राष्ट्रवादीच गुलाल घेणार - आमदार संग्राम जगताप

विधानसभेला सर्व कार्यकर्ते झटून कामाला लागा आपण गुलाल घेऊच, असा निर्धार आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
MLA Sangram Jagtap
MLA Sangram Jagtapsakal
Updated on

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत जे झाले ते झाले. यशाचे श्रेय घ्यायला सर्व तयार असतात. पराभव झाल्यानंतर सर्वजण आरोप करतात. मात्र, विधानसभेला सर्व कार्यकर्ते झटून कामाला लागतील. जिल्ह्यात राष्ट्रवादी २०१९ ची पुनरावृत्ती करील. आपण गुलाल घेऊ, असा निर्धार आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर, युवकचे अध्यक्ष सूरज चव्हाण आदींसह विविध आघाड्यांचे प्रमुख, तसेच जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

जगताप म्हणाले की, कोणाला आरोप करायचे असतील त्यांनी करावेत. परंतु ते लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातही थांबले नाहीत. कोणाला लढायचे असेल, त्यांनी नक्की लढावे. त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे.

शहरासाठी अजितदादांमुळे १५० कोटींचा निधी मिळाला. प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात किमान तीन ते चार कोटी रुपयांची कामे झाली. विधानसभा निवडणुकीत नक्कीच वेगळे चित्र असेल.

MLA Sangram Jagtap
Monsoon Update Maharashtra : मुसळधार पावसाचा मध्य महाराष्ट्राला इशारा

चाकणकर म्हणाल्या की, राज्य सरकारची व अजितदादांनी केलेली कामे जनतेपर्यंत नेण्यास आपण कमी पडलो. या निवडणुकीत आपली प्रचार यंत्रणा पूर्ण ताकदीने सज्ज करा.

अनुराधा नागवडे म्हणाल्या की, नगर शहरात आमदार जगताप विक्रमी मताधिक्क्यांनी निवडून येतील. श्रीगोंद्यात नागवडे कुटुंबातील सदस्य आमदार होईल. जिल्ह्यातही राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार निवडून येतील.

प्रारंभी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी प्रास्ताविकात स्वागत करून जिल्ह्याचा आढावा सादर केला. यावेळी अविनाश घुले, गणेश भोसले, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र गुंड, शिवाजी पाटील, प्रदेश उपाध्यक्ष स्वप्निल देसाई, संजय कोळगे,

बाळासाहेब जगताप आदींसह मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. दत्तात्रय पानसरे यांनी आभार मानले.

बैठकीत तटकरे नाराज

आढावा बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. पक्ष संघटन आणखी मजबूत करण्याची गरज आहे. पक्ष, संघटनेत काय बदल हवेत, कोणाच्या काही तक्रारी असतील, तर पुढच्या पंधरा दिवसांत त्या माझ्यापर्यंत पोहोचवा.

त्यात नक्की बदल केला जाईल. विधानसभेच्या जागा जिंकायच्या असतील, तस सर्वच आघाड्यांच्या प्रमुखांनी कामाला लागा, असे आवाहनही तटकरे यांनी केले.

रोहित पवारांवर टीका

राज्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. पक्षाच्या बैठकीत त्यांनी तशी वज्रमूठ बांधली आहे. कर्जत-जामखेडचे आमदार आमचे आमदार संपर्कात असल्याचा रोज नवीन दावा करतात. परंतु तेच भाजपच्या संपर्कात होते. त्यांनी आता नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत, असा टोला तटकरे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला.

जगताप यांच्या मंत्रिपदाची मागणी

आमदार संग्राम जगताप यांच्या मंत्रि‍पदासाठी आढावा बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आग्रह धरला. त्यांना मंत्रिपद मिळाल्यास जिल्ह्यात राष्ट्रवादी सर्वच जागा जिंकेल, असा विश्वासही ते व्यक्त करीत होते.

तटकरे यांनीही जगताप यांच्या कामाचे कौतुक केले. मंत्रि‍पदाबाबत विचारले असता, पक्षाच्या बैठकीत विचार झालेला नाही. जेव्हा विस्तार होईल, तेव्हा हा विषय समोर मांडू, असेही तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

MLA Sangram Jagtap
Ahmednagar Politics : राष्ट्रवादीच लढवणार; लोकसभेसाठी पवार, तनपुरे, ढाकणे, फाळकेंचा आग्रह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.