श्रीगोंदे : तरुणीच्या घरात घुसून बळजबरीने पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची व इतर साथीदारांची नागरिकांनी चांगलीच धुलाई केली. घटनेचे गांभीर्य वाढविण्याच्या हेतूने गोळीबार झाल्याचा बनाव करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील तरुणीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. त्यातून त्यांनी मागील महिन्यात पळून जाऊन विवाह केला होता. याप्रकरणी मुलीच्या आई, वडिलांनी फिर्याद दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यावर काही काळात मुलीचा शोध लागला. त्या तरुणीने केलेला विवाह आईवडिलांना मान्य नव्हता. तिला परत आणून तिची समजूत काढण्यात नातेवाईकांना यश आले.