Sudha Kankaria : स्त्री भ्रूणहत्येविरोधात लढणारी आधुनिक दुर्गा

Sudha Kankaria : डॉ. सुधा कांकरिया, स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध लढणाऱ्या आधुनिक दुर्गा म्हणून ओळखल्या जातात. 'बेटी बचाओ' आणि 'स्त्री जन्माचे स्वागत करा' या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजात परिवर्तन घडवले आहे.
sudha kankaria  journey
sudha kankaria journeysakal
Updated on

दुर्गावतार धारण करून आदिशक्तीने अनेक राक्षसांचा संहार केला. त्याचप्रमाणे जगातील अनेक महिलांनी एखाद्या कुप्रवृत्तीला मूठमाती देण्यासाठी दुर्गावतार घेतला. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लढल्या. असाच एक प्रश्न म्हणजे स्त्री भ्रूणहत्या. याच विषयावर नगरच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. सुधा कांकरिया यांचा लढा सुरू आहे.

डॉ. कांकरिया जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पिस अवॉर्डसाठी नामांकित आहेत. समाजसेवेचा वसा त्यांनी घेतला आहे. ‘बेटी बचाओ’, ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ या चळवळीच्या त्या अद्यप्रवर्तक मानल्या जातात. १९८५ सालापासून त्यांनी या कामाला स्वतःला वाहून घेतले. त्यांची नोंद वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये झाली.

स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यासाठी आधी महिलांना मान सन्मान मिळाला पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘नकोशीला करू या हवीशी’ व ‘आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा’ हा विचार जागतिक पातळीवर त्यांनी पहिल्यांदा मांडला. तो समाजात रुजू होण्यासाठी विशेष कष्ट घेतले. सुमारे दीड हजार नकोशींचे नामकरण केले. ११ हजार पेक्षा जास्त विवाहांत उपस्थित राहून ‘आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा’ घेतला. स्त्री जन्माच्या स्वागताची सामूहिक शपथ सुमारे ३० लाख व्यक्तींना दिली, ही मोठी उपलब्धी ठरली आहे.

डॉ. कांकरिया गेल्या १२ वर्षांपासून राजयोगा जीवन पद्धतीचा अभ्यास करतात. नऊ हजारांपेक्षा जास्त कोरोना बाधित व्यक्तींना त्यांनी मोफत हिलिंगची सेवा दिली. अंध, कारागृहातील कैदी बांधवांच्या मन:शांतीसाठी विशेष अभियान राबविले. भारतातील पहिल्या रोटरी पिस सेंटरच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. त्याद्वारे हजारो नागरिकांपर्यंत शांततेचा संदेश पोचविला. त्यांच्या कामाची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे. दोन राष्ट्रपतींच्या वतीने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेत विशेष गौरव करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.