Mohram: मोहरमसाठी नगरमध्ये ८०० पोलिसांचा ताफा, विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्हींचा राहणार वॉच

Ahmednagar : मोहरम विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे, मिरवणूक मार्गावर ६९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
police
policeesakal
Updated on

अहमदनगर , मोहरमच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. मंगळवारी रात्री निघणाऱ्या कत्तलची रात्र मिरवणुकीनंतर बुधवारी (ता. १७) दुपारी मोहरम विसर्जन मिरवणूक निघणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मिरवणूक मार्गासह शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात राहणार आहे.

मोहरम विसर्जन मिरवणूक वेळेत दिल्ली गेट बाहेर पडण्यासाठी सवारी खेळविणाऱ्या यंग पार्ट्यांना वेळेचे बंधन घालून देण्यात आलेले आहे. संवेदनशील, अतिसंवेदशनील ठिकाणी वेगळा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मंगळवारी रात्री १२ ते बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत कत्तलच्या रात्रीचे नियोजन आहे. बुधवारी दुपारी बारा वाजता मुख्य मोहरम विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

कोठला येथून इमाम हुसेन यांच्या सवारीची मिरवणूक निघेल, तर मंगल गेट हवेली येथून इमाम हसन यांची सवारी निघेल. यंग पार्ट्यांचे कार्यकर्ते इमाम हुसेन यांची सवारी खेळवतात. कोठला, फलटण पोलिस चौकी, मंगल गेट हवेली, आडते बाजार, पिंजार गल्ली, जुना कापड बाजार, खिस्त गल्ली, जुना कापड बाजार, पंचपीर चावडी, जुनी महापालिका, कोर्टातील मागील बाजूने दिल्ली गेट, बालिकाश्रम रोड, सावेडी असा विसर्जन मिरवणूक मार्ग आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मिरवणूक

"कत्तलची रात्र मिरवणूक, मुख्य विसर्जन मिरवणूक ठरविलेल्या वेळेत संपविण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. सवारी खेळविणाऱ्या यंग पार्ट्यांनी ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणेच सवारी खेळवावी, वेळेचे बंधन न पाळल्यास त्या यंग पार्ट्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.

- प्रशांत खैरे,

अपर पोलिस अधीक्षक

६९ सीसीटीव्ही कॅमेरे

कत्तलची रात्र व मोहरम विसर्जन मार्गावर ६९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्यात काही गल्ल्यांमध्ये छुपे कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. विसर्जन मिरवणूक मार्गावरील काही इमारतींचे छते देखील पोलिसांनी निगराणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

तडीपारीसह गुन्हेही दाखल

मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने शहरात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गुंड प्रवृत्तीच्या सुमारे ४६९ जणांना शहरातून दोन दिवसांसाठी तडीपार कण्यात आलेले आहे. तसेच चादर मिरवणुकीत डीजे लावल्याप्रकरणी १५ ते २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तडीपार केलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवरही पोलिस लक्ष ठेवून आहेत.

असा आहे बंदोबस्त

  • अतिरिक्त पोलिस अधीक्षक - २

  • पोलिस उपअधीक्षक - ४

  • पोलिस निरीक्षक - १८

  • सहायक निरीक्षक - ४१

  • पोलिस कर्मचारी - ६४१

  • राज्य राखीव दल - २ तुकड्या

  • शीघ्र कृती दल - १

  • दंगल नियंत्रक पथक - २

  • राज्य राखीव दर - २

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.