शिर्डी : निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी हा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
निळवंडे येथे उद्या (ता. ३१) कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, की धरण आणि कालव्यांचे काम होत असताना यामध्ये अनेकांनी सोयीनुसार राजकीय भूमिकाही बजावल्या.
आम्ही कालवे होऊ देत नाही, असे आरोप करून, विखे कुटुंबीयांना बदनाम करण्याचेही प्रयत्न वेळोवेळी झाले. परंतु, मुळात धरणाच्या मुखापाशीच कालव्यांची कामे सुरू नव्हती. तरीही खालच्या भागातील काही लोकांनी राजकीय आणि व्यक्तिद्वेशातून आंदोलने सुरू करून या विषयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला.
मात्र, आपणास ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्या त्या वेळी धरणाच्या निधीची उपलब्धता व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रयत्न केले. विरोधी पक्षनेता असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीसाठी आणि कालव्यांची कामे मार्गी लागावीत म्हणून पाठपुरावा केला.
केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांनीही निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले. धरणाच्या मुखाच्या २० किलोमीटर अंतरावरील कालव्यांची कामे सुरू व्हावीत, म्हणून ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या सहकार्याने आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळेच आजचा दिवस सर्वांना पाहायला मिळाला आणि हा प्रकल्प मार्गी लागण्यास पाठबळ मिळाले.
डाव्या कालव्याबरोबरच उजव्या कालव्याचीही कामे दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, धरणातील पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना निर्धारित वेळेत व्हावा, यादृष्टीनेच आता पुढील काही महिन्यांचे नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने या प्रकल्पासाठी आता पाच हजार ७०० कोटी रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने या प्रकल्पातील सर्वच अडथळे दूर झाले आहेत. धरणाच्या लाभक्षेत्रातील सर्वच तालुक्यांतील कालव्यांची कामे मार्गी लागत आहेत.
- राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री
निळवंडे कालव्यात पाणी सोडल्याने आमच्या शेतीचे पाणी कमी होईल, अशी भीती प्रवरेच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांना वाटते. त्यांच्यासह प्रवरा व गोदावरी कालव्यांची तूट भरून काढण्यासाठी पश्चिमेचे पाणी पूर्वेला आणण्याच्या प्रकल्पाच्या पाठपुराव्यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. हे कामदेखील सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करून दाखवू.
- सदाशिव लोखंडे, खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.