Monika Rajale : पंकजा मुंडेंना अडचणीत आणण्याचा डाव..

In a press release in this regard, Rajale said: काही विघ्नसंतोषी लोक मुंडे यांच्या विषयी खोट्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांना देऊन त्यांना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत; राजळे
pankaja munde
pankaja mundesakal
Updated on

पाथर्डी : पूजा खेडकर प्रकरणात खेडकर कुटुंबाशी आमदार पंकजा मुंडे यांचा कोणताही संबंध नसून, या प्रकरणी मुंडे यांना विनाकारण ट्रोल केले जात असल्याचा आरोप आमदार मोनिका राजळे यांनी केला. या संदर्भात प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात राजळे यांनी म्हटले आहे की, काही विघ्नसंतोषी लोक मुंडे यांच्या विषयी खोट्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांना देऊन त्यांना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत.

खेडकर कुटुंबाने मुंडे यांना बारा लाखांचा चेक दिला व मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, म्हणून खेडकर यांनी मोहटादेवीला चांदीचा मुकुट अर्पण केला, अशा ज्या बातम्या सध्या विरोधक पेरत आहेत, त्यामध्ये काहीही तथ्य नसून, मध्यंतरी मुंडे यांच्या कारखान्याला जीएसटी व कराच्या संदर्भात नोटिसा आल्यानंतर राज्यात असलेल्या व मुंडे यांच्या कुटुंबाच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या अनेकांनी मुंडे यांना फोन करत तुम्हाला आम्ही मदत करणार असल्याचे सांगितले.

pankaja munde
Karnataka: 'खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना 100 टक्के आरक्षण' सिद्दरामय्यांनी ट्वीट केलं डिलिट, मंत्री म्हणाले...

तसेच काहींनी मुंडे यांना चेक सुद्धा पाठवले. मात्र मुंडे यांनी हे चेक स्वीकारले नाहीत. उलट मी तुमची आभारी आहे, असे सांगितले. मुंडे या मोहटा देवीच्या दर्शनासाठी आल्या असताना त्या वेळी खेडकर हे अचानक मुंडे यांच्याकडे आले व त्यांनी तुम्हाला लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मी देवीला चांदीचा मुकुट अर्पण करणार असल्याचा देवीला नवस केला होता व तो मुकुट आज मी देवीला अर्पण करत आहे, असे सांगितले.

मुंडे यांना याची माहिती नव्हती. मात्र या प्रकरणावरून विनाकारण मुंडे यांना अडचणीत आणण्याचे काम विरोधक करत असल्याचे राजळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

pankaja munde
Shivbhojan Thali : दीड लाख शिवभोजन थाळीचे लाभार्थी, अनुदान रखडल्‍याने चालक त्रस्‍त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.