Ahmednagar : महावितरणने फोडला जनतेला घाम; नागरिक त्रस्त

वारंवार खंडित वीजपुरवठ्याचा शॉक; विद्युत उपकरणे जळाल्याने फटका
msedcl mseb repeated interruptions in power supply Burned electrical equipment
msedcl mseb repeated interruptions in power supply Burned electrical equipmentsakal
Updated on

अहमदनगर : उन्हाची तीव्रता वाढली असून, अंगाची लाही लाही होत आहे. त्यातच आता महावितरणने संकटात भर टाकली असून, वारंवार वीजपुरवठा खंडित करून जनतेला घाम फोडला आहे.

रोजच्या या प्रकारामुळे महावितरणच्या कारभारावर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. याबाबत अनेकांनी महावितरणकडे तक्रारी करूनही सुस्त यंत्रणेकडून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे भर उन्हाच्या कडाक्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची घरात घालमेल होत आहे. हा प्रकार गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे.

याबाबत अनेकांनी महावितरणच्या कार्यालयांशी संपर्क साधून तक्रारही केल्या आहेत. मात्र, ‘तांत्रिक बिघाड आहे, तो दुरुस्त झालेला आहे. आता वीजपुरवठा खंडित होणार नाही,’ अशी थातुरमातुर उत्तरे देऊन ग्राहकांची बोळवण केली जात आहे.

मात्र, पुनःपुन्हा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे अनेकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडे बोलही सुनावले आहे. तरी परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने नागरिकांमधून महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, महावितरणकडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेकांच्या घरातील वीज उपकरणे नादुरुस्त होत आहेत. याबाबतही अनेकांनी महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

भारनियमनाबरोबरच ग्रामीण भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. रोहित्रं जळण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.

msedcl mseb repeated interruptions in power supply Burned electrical equipment
Nandurbar MSEDCL News : वीज बिलाच्या अतिरिक्त भुर्दंडामुळे ग्राहकांमध्ये नाराजी

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना उकाड्याने हैराण केलेले आहे. त्यातच महावितरणकडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात पिके जळू लागली आहेत. त्यामुळे महावितरणने कारभारात सुधारणा करणे गरजेचे आहे.

- गौरी गणेश ननावरे, नगरसेवक, केडगाव

ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्याबरोबरच रोहित्र जळाल्यानंतर ते तातडीने दुरुस्त केले जात नाही. त्यामुळे पिके जळत आहेत. महावितरणच्या कारभाराचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. महावितरणने कारभारात सुधारणा न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल.

- सुधीर भद्रे, जिल्हाध्यक्ष, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन

msedcl mseb repeated interruptions in power supply Burned electrical equipment
Pune : शेतकरी संजय माताळे यांचा गोऱ्हे खुर्द येथे सन्मान; राष्ट्रपती पुरस्कार देण्याची मागणी

अधिकारी नॉट रिचेबल

वारंवार वीजपुरवठा खंडित का होतोय, याची माहिती घेण्यासाठी ग्राहक अनेकदा महावितरणच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करतात. मात्र, त्यांचे मोबाईल नॉट रिचेबल आहेत. कार्यालयीन वेळेसह इतर वेळीही अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद राहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.