Ahmednagar : मनपाचे कामकाज उद्यापासून ठप्प ; कर्मचारी सामूहिक रजेवर; अहमदनगर ते मंत्रालय निघणार लाँग मार्च

लाँग मार्चमध्ये महापालिकेतील सर्व कर्मचारी सहकुटुंब सहभागी होणार आहेत.
ahmednagar
ahmednagarsakal
Updated on

अहमदनगर - सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचे लाभ लागू करावेत, या प्रमुख मागणीसाठी महानगरपालिकेचे कर्मचारी सोमवारपासून (ता. २) सामूहिक रजेवर जाणार आहेत. हे कर्मचारी सकाळी १० वाजता अहमदनगर ते मंत्रालय पायी लाँग मार्च काढणार आहेत. त्यामुळे महापालिकेचे दैनंदिन कामकाज ठप्प होणार आहे.

लाँग मार्चमध्ये महापालिकेतील सर्व कर्मचारी सहकुटुंब सहभागी होणार आहेत. अग्निशमन, आरोग्य व पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवा वगळता महापालिकेचे सर्व कामकाज बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली. राज्यातील इतर महापालिकांच्या आस्थापना खर्चाची टक्केवारी ही शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीपेक्षा कित्येक प्रमाणात जास्त आहे,

असे असतानाही या महापालिकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत. मात्र, अहमदनगर महानगरपालिकेची आस्थापना लागू खर्चाची टक्केवारी जादा असल्याचे कारण पुढे करून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचे लाभ नाकारण्यात आले आहेत. त्या निषेधार्थ हा लाँग मार्च काढण्यात येत आहे.

ahmednagar
Solapur : ऊसापासुन इथेनॉल निर्मिती करणार ; हंगामात साडे सहा लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दीष्ट - विश्वराज महाडिक

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात, तसेच लाड समितीच्या शिफारशीनुसार, दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नेमणुका देण्यात याव्यात, या प्रमुख मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. लाँग मार्चमध्ये सर्व कर्मचारी सहकुटुंब सहभागी होणार आहेत. कर्मचारी १६ दिवसांचा पायी प्रवास करून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे देणार आहेत.

ahmednagar
Chh. Sambhaji Nagar : भरदिवसा लुटणारा चार तासांत जेरबंद ; वाळूजमध्ये खाम नदीकाठच्या मंदिर परिसरात प्रकार

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याची ठाम भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली आहे.

आंदोलनावर संघटना ठाम

कर्मचाऱ्यांनी लाँग मार्चमध्ये सहभागी होऊ नये व स्थानिक स्तरावरच मागण्यांसाठी आंदोलन करावे, महापालिकेचे कामकाज बंद पडू देऊ नये, असे आवाहन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी वेळोवेळी केले, परंतु राज्य शासनाला जाब विचारण्यासाठी या ‘लाँग मार्च’ आंदोलनावर संघटना ठाम आहे.

स्वच्छता अभियान बारगळणार ?

महापालिकेतर्फे शहरात स्वच्छता अभियान सुरू आहे. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी साफसफाई करण्यात येणार आहे. मात्र, याच दिवशी कर्मचारी लाँग मार्चवर निघणार असल्याने महापालिकेचे स्वच्छता अभियान बारगळणार आहे.

दृष्टिक्षेपात पालिका

एकूण कर्मचारी- १७५०

सुरू राहणारे विभाग- ३

सहभागी कर्मचारी- १२००

ahmednagar
Nagpur News : उपराजधानीत दोन ठिकाणी आग

सामूहिक रजेचे दिवस - १६

या सेवा होणार ठप्प

दैनंदिन साफसफाई

जन्म-मृत्यू नोंद

नळजोडांची कामे

बांधकाम परवानग्या

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची अनेक दिवसांची मागणी आहे. मात्र, शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यासाठी हा लाँग मार्च काढण्यात येत आहे. आंदोलनावर आम्ही ठाम आहोत.

- अनंत लोखंडे, अध्यक्ष, मनपा कर्मचारी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.