अहमदनगर : शहरातील बंगाली चौक रस्त्यावर खून

Murder on Bengali Chowk Road in Ahmednagar city
Murder on Bengali Chowk Road in Ahmednagar cityesakal
Updated on

अहमदनगर : शहरातील बंगाली चौक रस्त्यावर एका 40 वर्षीय पुरूषाचा टणक हत्याराने निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले आहे. मयत व्यक्‍तीची जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. या अहवालात मयताचा मृत्यू हा टणक वस्तूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महिला पोलिस हवालदार वैशाली पठारे यांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर शहरातील बंगाली चौक ते धरती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील श्रध्दा इमारतीसमोर रॅम्पजवळ ता. 29 सप्टेंबर 2021 रोजी एक अनोळखी व्यक्‍ती जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याचा तपास महिला पोलिस हवालदार वैशाली पठारे या करीत होत्या. मयत व्यक्तीची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल नुकताच कोतवाली पोलिसांना प्राप्त झाला. सदर व्यक्तीला मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणी अहवालातून समोर आले आहे. मृत व्यक्तीच्या डोक्‍याला टणक वस्तूने मारल्याने डोक्‍याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत झाली, असे या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, खुनाचा गुन्हा दाखल झाला असला तरी खून झालेल्या व्यक्तीसह त्याला मारणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

Murder on Bengali Chowk Road in Ahmednagar city
भीम आर्मीचे चंद्रशेखर यांची सपासोबत युती; म्हणाले, BJP चा पराभव अटळ...
Murder on Bengali Chowk Road in Ahmednagar city
अहमदनगर : शिवसैनिकांच्या हत्याप्रकरणी माजी उपमहापौरांना जामीन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()