अहमदनगरचे पालकमंत्रीपद सोडण्यावर मुश्रीफ ठाम

hasan mushrif
hasan mushrifsakal
Updated on

अहमदनगर : कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य निवडणुकांना एकाच वेळी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये पुरेशा प्रमाणात वेळ देऊन शकणार नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे अहमदनगरचे पालकमंत्रीपद (Guardian Minister) पाच महिन्यांपूर्वी सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. प्रजासत्ताक दिनापर्यंत (Republic day) अहमदनगरच्या पालकमंत्री पदावर राहिलो तर प्रत्यक्षात अहमदनगरला येतो. पालकमंत्री पदात बदल झाल्यास ग्रामविकास मंत्री या नात्यानंतर जिल्ह्यात येत राहील, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन पत्रकार परिषदेत पालकमंत्री ना. मुश्रीफ बोलत होते. पालकमंत्री पद बदलण्याच्या हालचाली बाबत मंत्री मुश्रीफ यांच्याकडे विचारणा करण्यात आली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, पक्षश्रेष्ठींकडे पाच महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्ष श्रेष्ठींनी मला अद्याप मुक्त केलेले नाही. पालकमंत्री पदाच्या संभाव्य बदलाबाबत माझ्या कानावर काही आलेले नाही. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीची पाहणी तुम्ही कधी करणार असे विचारताच ना. मुश्रीफ यांनी प्रजासत्ताकदिनापर्यंत अहमदनगरचा पालकमंत्रीपदावर राहिलो तर नक्कीच अहमदनगरला येऊन नूतन इमारतीची पाहणी करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

hasan mushrif
Omicronमुळे लगीनघाईला पुन्हा एकदा ब्रेक लागण्याची शक्यता...

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अंदाजे पाच महिने पुढे जाण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली. ता. 17 रोजी सर्वोच्च न्यायालयात ओ.बी.सी. आरक्षणाबाबत (OBC reservation) सुनावणी आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी मध्यप्रदेशसह महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहे. आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा संकलित करण्यासाठी पाच कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आणखी 475 कोटींची पुरवणी मागणी करण्यात आली. यातून साधारण चार महिन्यांत हा डेटा उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर ओबीसी आरक्षण लागू होऊ शकते. यामुळे साधारणपणे पाच महिने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणकिा लांबणीवर पडण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्‍त केली.

hasan mushrif
संतापजनक! आरोग्य केंद्राने बाहेरचा रस्ता दाखवला; रस्त्यावरच झाली प्रसूती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.