Shirdi News - निराधार वयोवृद्ध तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकरीण यांना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाच लाख रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला.
यापूर्वी कोल्हे यांच्याच पुढाकारातून त्यांना येथील द्वारकामाई वृद्धाश्रमास हक्काचा आणि सुरक्षित निवारा मिळाला होता. बरीच वर्षे भटकंती केल्यानंतर आता या मदतीमुळे शांताबाईंच्या जीवनात स्थैर्य येण्यास मदत होईल. (Shantabai Kopargaonkar)
आवाजातील गोडवा आणि लावणी सादर करतानाची अदाकारी, यामुळे त्यांनी एकेकाळी तमाशाचे फड गाजवले. मात्र आर्थिक व्यवहाराची जाण नसल्याने वृद्धापकाळात त्या अक्षरशः निराधार झाल्या. वाढत्या वयामुळे स्मृती क्षीण झाली.
बरेच दिवस त्या कोपरगावच्या बसस्थानकावर फिरत होत्या. त्यांची याच बसस्थानकावर लावणी गातानाची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली. एकेकाळी धुळे, जळगाव भागात त्यांची कारकीर्द गाजली होती. त्याभागातील जाणकार रसिकांचा त्यास मोठा प्रतिसाद मिळाला.
त्याची ही अवस्था पाहून माजी आमदार कोल्हे यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला. त्यांना शिर्डीच्या द्वारकाई वृद्धाश्रमात निवारा मिळवून दिला. शंभराहून अधिक वृद्धांचा सांभाळ करणारे, या वृद्धाश्रमाचे चालक श्रीनिवास व त्यांच्या पत्नी सुधा यांनी आनंदाने शांताबाईचे पालकत्व स्वीकारले. गेल्या दोन महिन्यांपासून त्या येथे आनंदात राहात आहेत. (Tamasha)
त्यानंतर कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत संपर्क साधून शांताबाईंची परिस्थिती कथन केली. त्यानंतर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा जागृत झाली. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी वृद्धाश्रमास भेट देऊन शांताबाईंची विचारपूस केली. त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
शिंदे यांनी आपण श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने त्यांना पाच लाख रुपयांची मदत करू, असे आश्वासन कोल्हे यांना दिले होते. आजच्या शिर्डी भेटीत त्यांनी दिलेला शब्द पाळत कोल्हे यांच्या उपस्थितीत शांताबाईंकडे पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. (Latest Marathi News)
एकेकाळी रसिकांच्या मनावर राज्य करणारे शांताबाई सारखे तमाशा कलावंत हा महाराष्ट्राचा अनमोल ठेवा आहे. त्या मूळच्या कोपरगावच्या. त्यांची स्थिती पाहून त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला.
शिर्डीच्या द्वारकामाई वृद्धाश्रमाचे सेवाभावी चालक श्रीनिवास व त्यांच्या पत्नी सुधा यांची मी आभारी आहे. त्यांनी शांताबाईंचे पालकत्व स्वीकारले. मुख्यमंत्र्यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत पाच लाख रुपये दिले. ही मदत या शांताबाई आणि अन्य निराधारांचे संगोपन करणाऱ्या आश्रमाला दिली जाईल.
- स्नेहलता कोल्हे, माजी आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.