Nagar Crime : सुगंधी तंबाखू विकणाऱ्या चौघा जणांना नगरमध्ये अटक

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार नाला परिसरात सापळा लावून ही कारवाई करण्यात आली.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

Nagar Crime - सुगंधी तंबाखूची विक्री करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुगंधी तंबाखूसह सहा लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिंगार नाला परिसरात ही कारवाई केली.

Crime News
Mumbai : टाऊनशिपसाठी मुद्रांक शुल्क माफीला विरोध! एका बांधकाम व्यावसायिकासाठी निर्णय घेतल्याचा आरोप

उमेश श्‍यामलाल मालपाणी (वय ३१, रा. वावरेचाळ, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक), सुभाष अशोक बोर्डे (वय २७, रा. भाऊसिंगपुरा, साईनगर, लालमाती, जि. छत्रपती संभाजीनगर), शुभम रंगनाथ टाले (वय २३, रा. इसोली, ता. चिखली, जि. बुलढाणा) व मयूर रतन चाबुकस्वार (वय ३०, रा. ब्राह्मणगल्ली, माळीवाडा, अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Crime News
Mumbai News : गोरेगावमध्ये गॅस गळतीमुळे आग; आगीत होरपळून एकाचा मृत्यू

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार नाला परिसरात सापळा लावून ही कारवाई करण्यात आली. टेम्पोत मिळून आलेली सुगंधी तंबाखू ही जितेंद्र नरेंद्र चांडक ऊर्फ मालपाणी (रा. लवेंडर सोसायटी, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्या मालकीचा असल्याचे ताब्यात घेतलेल्या आरोपींनी सांगितले.

दरम्यान, आरोपी जितेंद्र चांडक हा फरार आहे. आरोपींकडून ८५ हजार ६०० रुपये किमतीची सुगंधी तंबाखू, ५० हजार रुपयांची मोपेड गाडी व पाच लाख रुपये किमतीचा मालवाहू टेम्पो, असा एकूण सहा लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.