Student Struggle For Education : नायगाव तालुक्यात शिक्षणासाठी विद्यार्थ्याचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचे दुर्लक्ष

नायगाव तालुक्यातील बरबडा येथील प्रकार : वाहतूक नियमांचे तीनतेरा!
Student Struggle For Education
Student Struggle For Educationsakal
Updated on

चंद्रकांत सूर्यतळ

बरबडा - शहरांमध्ये ऑटो, विद्यार्थ्यांनी गच्च भरलेल्या गाड्या आपण रोजच पाहतो; पण त्यापेक्षा भयानक आणि विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणारे दृष्य मंगळवारी (ता.१८) रोजी बरबडा येथे दिसून आले. येथे विद्यार्थी एसटी बसच्या टपावर बसून शाळेचा आणि महाविद्यालयाचा प्रवास करतांना दिसून आले.

Student Struggle For Education
Ahmednagar News : पुरवणी अर्थसंकल्पात निधीची तरतूद, रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर - प्राजक्त तनपुरे

त्यामुळे मुलभूत ग्रामीण भागात शिक्षण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांवर अशी वेळ आली असूनही चिंतेची बाब आहे. याबाबत बसचालक, वाहकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.

बरबडा, इजतगाव, मनूर, आंतरगाव येथील ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांचे अपुऱ्या बसअभावी हाल होत आहेत.

Student Struggle For Education
Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील शवविच्‍छेदनगृहे बंद

बरबडा येथे मंगळवारी सकाळी शाळेचे विद्यार्थी बसमध्ये जागा नसल्यामुळे फाट्यावरुन गावातील शाळेत जाण्याकरीत उभे असतांना गाडी प्रवाशांनी गच्च भरलेली होती. त्यामुळे विद्यार्थी चक्क एसटी बसच्या टपावर बसुन प्रवास करतांना दिसून आले. त्यामुळे बस चालक आणि वाहकाने विद्यार्थ्यांना टपावर कसे काय बसू दिले? आणि बसल्यावर बस कशी काय पुढील प्रवासासाठी रवाना झाली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

Student Struggle For Education
Ahmednagar School News : १६१ शाळांवर टांगती तलवार, पटसंख्येचा प्रश्‍न; शिक्षक भारतीची आक्रमक भूमिका

परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व परत गावाकडे जाण्याकरिता बसमध्ये जागा मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना बसच्या टपावर बसून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अपूऱ्या बस बंद करून टाकल्या आहेत.

बरबडा सर्कलमध्ये अनेक खेडेगावांपर्यंत बस पोहचत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवासी नागरिकांना अंनत अडचणींचा सामना करावा लागला आहे. नांदेडहून येणारी नांदेड इज्जगाव बस पाटोदा, बरबडा, आंतरगाव, मनूर, इज्जगावपर्यंत दिवसातून एकच गाडी येत आहे. प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.