पारनेरमध्ये फडकणार राष्ट्रवादीचा झेंडा

‘शहरविकास’च्या दोन्ही नगरसेवकांनी दिला पाठिंबा; गटनोंदणीतही सहभाग
Parner Nagarpanchayat Election Result News
Parner Nagarpanchayat Election Result Newssakal
Updated on

पारनेर : शहर विकास आघाडीच्या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पारनेर नगरपंचायतीवर (Parner Nagar Panchayat) राष्ट्रवादीचा झेंडा (NCP Flag) फडकणार असून, राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. नवनिर्वाचित नगरसेविका सुरेखा अर्जुन भालेकर व नगरसेवक भूषण शेलार यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. या दोन्ही नगरसेवकांमुळे राष्ट्रवादीला बहुमताचा आकडा गाठणे शक्य झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची सदस्य संख्या सात वरून थेट नऊवर गेली आहे. या नऊ नगरसेवकांची तशी गटनोंदणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.(Parner Nagarpanchayat Election Result News)

Parner Nagarpanchayat Election Result News
अहमदनगर : जिल्हा बॅंक नोकरभरतीविरोधात याचिका

निकाल जाहीर झाल्यानंतर आमदार लंके यांनी आमचे सात नगरसेवक निवडून आले असले, तरी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर २४ तासांतच त्यांनी नगरपंचायतीत निवडून आलेल्या सात सदस्यांचा अल्पमतातील आकडा शहरविकास आघाडीच्या भालेकर व शेलार यांच्या साह्याने बहुमतावर नेऊन ठेवला आहे. नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सात, शिवसेनेचे सहा, तर शहर विकास आघाडीला दोन, भाजपला एक व अपक्षाला एक जागा मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. निकालानंतर लगेचच राजकीय घडामोडींना वेग आला. रात्रीच राजकीय बैठकांचा सिलसिला सुरू झाला. शहर विकास आघाडी व अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देतील, अशी चर्चा होती. प्रथम भालेकर यांनी पारनेर शहरातील पक्ष कार्यालयात, तर पाठोपाठ शेलार यांनीही नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अनेकांना धक्का बसला. भाजप व एक अपक्ष सध्या तटस्थ आहेत.आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात अनेक विकासकामे सुरू आहेत. या कामांमुळे पारनेर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली.

Parner Nagarpanchayat Election Result News
अहमदनगर : ११८ कर्मचाऱ्यांना संप भोवला

पारनेर नगरपंचायतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह शहर विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांची आज गटनोंदणी करण्यात आली. त्यानंतर नूतन नगरसेवकांचा सत्कार जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवकांनीही जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचा सत्कार केला. यावेळी आमदार नीलेश लंके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. फाळके म्हणाले, की पारनेर नगरपंचायतीच्या निकालामध्ये त्रिशंकू निकाल वाटत होता. मात्र, राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा पार केलेला आहे. शहर विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने आता राष्ट्रवादीचे संख्या बळ नऊ झालेले आहे. त्यात आणखी वाड होणार आहे. जसा २०१९ला चमत्कार झाला. तसाच चमत्कार नगरपंचायतीच्या निवडणुकीत झालेला आहे. तालुक्यात सुरु असलेल्या कामांची या निवडणुकीत पावती मिळालेली आहे. लंके यांच्या कामाची पक्ष नक्कीच दखल घेऊन त्यांना चांगली संधी देईल, असे ते म्हणाले.

Parner Nagarpanchayat Election Result News
भाजपात बंडखोरीचे सूर; दहा नेत्यांची तिकीटे कापली

आमदार नीलेश लंके म्हणाले की, नगरपंचायत निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची चांगली साथ मिळाली आहे. त्यामुळे यश मिळालेले असून मतदार संघात विकास कामे होत आहेत. शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे संख्या बळ वाढलेले असून येत्या काळातही त्यात आणखी वाढ होणार आहे. सर्व नगरसेवकांची आज गटनोंदणी झालेली असून गटनेता म्हणून विजय सदाशिव औटी यांची निवड केली असल्याचे ते म्हणाले.

बिनशर्त आल्यास स्वागत

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. तसेच शिवसेनेला घेऊन आपण पारनेर नगरपंचायतीमध्ये सत्ता स्थापन करणार का, या प्रश्‍नाला जिल्हाध्यक्ष फाळके यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, बिनशर्त आल्यास त्यांचे स्वागत आहे.

पारनेर शहराचा पाणी प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागणार आहे. शहराच्या विकासासाठीच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

- सुरेखा अर्जुन भालेकर, नवनिर्वाचित नगरसेविका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.