Sunil Tatkare : ‘राष्ट्रवादी’चे आमदार अजित पवारांसोबत

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मार्गदर्शन केले.
Sunil Tatkare
Sunil Tatkareesakal
Updated on

अहमदनगर - ‘लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी जाणीवपूर्वक घटनादुरुस्तीचा मुद्दा आणून धार्मिक ध्रुवीकरण केले. त्यांना एका निवडणुकीत सहानुभूती मिळाली असेल. पण जनता सावध आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत असे घडणार नाही. एकही आमदार फुटणार नाही. सर्वांनी एकमताने अजित पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी येथून राज्यव्यापी दौऱ्यास प्रारंभ केला. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार संग्राम जगताप आदी उपस्थित होते. तटकरे म्हणाले की, आगामी निवडणुकीत विरोधकांनी चुकीचे मुद्दे मांडले, तर त्यांना उत्तर द्या.

महायुती म्हणूनच लढायचेय

‘विधानसभा निवडणूकही महायुती म्हणूनच लढणार आहोत. ज्या जागा आपल्याकडे आहेत, त्या आपल्याकडेच ठेवून अधिक जागा कशा मिळतील, हे पाहू. लोकसभा निवडणुकीत आपण कोठे कमी पडलो, हे याचे आत्मचिंतन व आत्मपरीक्षण होणे आवश्यक आहे. जो उणेपणा आहे, तो दूर करून जो घटक आपल्यापासून दुरावला आहे, त्यांना पुन्हा एकदा विश्वास द्या. पक्षाची ध्येयधोरणे, विचार घेऊन नव्या विश्वासाने जनतेत जा. आपण नक्कीच यशस्वी होऊ,’ असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.