शिर्डी (जि. अहमदनगर) : देशातील एक प्रमुख धार्मिक पर्यटन केंद्र व रोजगाराच्या सर्वाधिक संधी देणारे देवस्थान, अशी साईबाबांच्या शिर्डीची ओळख. कोविड प्रकोपामुळे मंदिर बंद झाल्याने येथील अर्थकारण ठप्प झाले. उत्पन्न रोडावले व खर्च कमी करणे मुश्कील, अशी साईसंस्थानची अवस्था. भविष्यात दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी, शिर्डीसह नित्यसंपर्क असलेल्या तीस गावांचे युद्धपातळीवर कोविड लसीकरण करणे, हा या अर्थिक अरिष्ट्यावर मार्ग शोधण्याचा एकमेव पर्याय शिल्लक राहीला आहे. (Need-for-vaccination-in-villages-in-including-Shirdi-marathi-news)
ठप्प अर्थकारणावर लशीची मात्रा
मंदिरे खुली करण्याचा निर्णय होईल त्यावेळी शिर्डी व परिसराचे लसीकरण पूर्ण झालेले असेल, तरच साईदर्शन व अर्थकारण पुढे सुरळीत सुरू राहील. संसर्गाच्या फैलावाची भीती कमी होईल. परिस्थिती पाहून लसीकरण झालेल्या भाविकांनाच मंदिर प्रवेश हा पर्याय समोर ठेऊन अडचणीच्या काळातही मंदिर सुरू ठेवता येईल. पहिल्या लाटेत बंधने पाळून दर्शन व्यवस्था सुरू ठेवण्यात आली. त्याकाळात साडेतीन ते चार महिन्यांत साईमंदिराला अवघे चोवीस कोटी रुपये उत्पन्न मिळाले. सध्या केवळ कामगारांच्या वेतनापोटी वार्षिक नव्वद कोटी रुपये खर्च करावा लागतो. जाणकारांच्या मते दिवसाकाठी पंधरा हजार भाविकांची दर्शन व्यवस्था निर्धोकपणे करता आली, तर हे उत्पन्न वर्षाकाठी दोनशे कोटी रुपयांवर जाऊ शकते. उत्पन्न आणि खर्चातील तूट कमी होण्यास थोडी मदत होऊ शकते.
शिर्डी व परिसरातील गावांची दीड लाख लोकसंख्या गृहित धरली, तर त्यापैकी सुमारे चाळीस हजार लोकांना कोविड लशीचा पहिला डोस मिळाला आहे. एक लाख डोस हवे आहेत. त्यासाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च येईल. दुसरा डोस सरकारी यंत्रणे मार्फत मिळत राहील. खासगी क्षेत्राला एकूण उत्पादनाच्या पंचवीस टक्के लस देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्याआधारे साईभक्त असलेले राष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय मंत्र्यांना साकडे घालून हे डोस मिळवता येतील का, यासाठी रिलायन्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांसारखे उद्योजक व केंद्र सरकारात वजन असलेले अनेक नामांकित साईभक्त देश-विदेशात आहेत त्यांचे सहकार्य घेता येईल का, याचा शोध घ्यायला हवा. खरोखरीच युद्धपातळीवर लसीकरण करता आले, तर शिर्डी भोवतालचा अर्थिक संकटाचा विळखा सैल करण्यास भविष्यात मोठी मदत होईल.
खासगी क्षेत्राला मिळणाऱ्या कोट्यातून शिर्डी व संपर्कात असलेल्या अन्य गावांसाठी लसीचा कोटा खरेदी करणे, एेपत आहे त्यांनी ती सशुल्क घेणे, मंदिरे खुली झाल्यानंतर दर्शनाचे नियम नक्की करणे, हा पर्याय योग्य वाटतो. मात्र केंद्राकडे लशीचा किती कोटा उपलब्ध आहे, त्यांचा प्राधान्यक्रम काय आहे, हे विचारात घ्यावे लागेल. तथापि रोजगार निर्मितीचे प्रमुख केंद्र या नात्याने अन्य उद्योगांप्रमाणे साईसंस्थानने शिर्डी व परिसराचे सशुल्क लसीकरण युद्धपातळीवर हाती घेण्यात काही वावगे नाही. - द. म. सुकथनकर, माजी साई संस्थान अध्यक्ष
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.