नेवासे : शासनाच्या विविध योजनेतील घरकुले मंजूर करण्यात नेवासे तालुका अहमदनगर जिल्ह्यात अव्वलस्थानी आहे. गेल्या पाच वर्षांत आतापर्यंत तालुक्यासाठी ९ हजार ३५ इतके घरकुले मंजूर झाली आहेत. त्यापैकी सुमारे ६ हजार ६१४ घरकुले पूर्ण झाली. त्यासाठी शासनाने ७९ कोटी ५२ लाख ८० हजार इतका खर्च केला आहे. पक्की घरे मिळाल्यामुळे लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शन व माजी सभापती सुनीता गडाख यांच्या नेतृत्वाखाली व आजी-माजी सभापती-उपसभापतींसह गट विकास अधिकारी शेखर शेलार यांनी घरकुलाबाबत नियोजनबद्ध आराखडा तयार केला होता.त्यात नेवासे तालुक्यात गेल्या पाच वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ६ हजार ३२९ घरकुल मंजूर आहेत. ४ हजार ५९६ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहे.
रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत २०१६ ते २२ या वर्षात २ हजार ५११ घरकुले मंजूर करण्यात आली. शबरी घरकुल योजनेत १९५ घरकुलांना मंजुरी मिळाली. त्यामध्ये दोन्ही योजना मिळून २ हजार १६ घरकुले बांधून पूर्ण झाली. नेवासे पंचायत समितीमार्फत आतापर्यंत गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत प्रधानमंत्री, रमाई, शबरी या विविध घरकुल योजनेच्या अंतर्गत ९ हजार ३६ घरकुलांना मंजुरी मिळाली. त्यात ६ हजार ६१४ घरकुलांची कामे पूर्ण झाली. ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
मंत्री शंकरराव गडाख व माजी सभापती सुनीता गडाख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे सभापती सुनील गडाख यांचे सहकार्याने विविध योजनेंतर्गत घरकुले मंजुरी व कामात नेवासे तालुका जिल्ह्यात प्रथम असल्याचा अभिमान आहे.
-रावसाहेब कांगुणे, सभापती, पंचायत समिती, नेवासे.
मंजूर घरकुलांपैकी २ हजार ४०७ घरकुले अपूर्ण अवस्थेत आहेत. ती लवकर पूर्ण करावीत. लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आमचा प्रयत्न आहे.
- शेखर शेलार, गटविकास अधिकारी, नेवासे
ग्रामीण अर्थकारणाला मिळाली चालना
नेवासे तालुक्यात एकूण ९ हजार ३६ घरकुलांना प्रत्येकी १ लाख ४२ हजार ३२० रुपये मिळतात. त्यामुळे हाच पैसा तालुक्यातील विविध गावांच्या बाजारपेठेत फिरल्याने गवंडी, कामगार, इतर कारागिरांना रोजगार मिळाला. तसेच बांधकाम साहित्य व्यवसायिकांनाही याचा लाभ होणार असल्याने यातून नक्कीच ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळेल.
प्रधानमंत्री आवास योजना
वर्ष मंजूर कामे पूर्ण
२०१६-१७ ९७९ ८६७
२०१७-१८ १०८४ ९८५
२०१८-१९ ३९० ३०३
२०१९-२० १७७९ १२४१
२०२०-२१ २०९७ १२०२
एकूण ६३२९ ४५९८
वर्ष- २०१६-२१
योजना मंजूर कामे पूर्ण
रमाई २५१८ १८८३
शबरी १८७ १३३
पारधी समाज ०१ ००
एकूण २७०६ २०१६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.