गुंडगिरी खपवून घेणार नाही! पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगलाचा इशारा, रात्रीच स्वीकारला पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार पदभार

पोलिस आयुक्त म्हणून शहरातील सर्व घटकातील नागरिकांना न्याय देण्यात असून कोणतीही गुंडशाही आणि झुंडशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिला.
गुंडगिरी खपवून घेणार नाही! पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगलाचा इशारा, रात्रीच स्वीकारला पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार पदभार
Updated on

Ravindra Singla New CP of Nagpur: पोलिस आयुक्त म्हणून शहरातील सर्व घटकातील नागरिकांना न्याय देण्यात असून कोणतीही गुंडशाही आणि झुंडशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिला. गुरुवारी रात्री सह आयुक्त अस्वती दोरजे यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.


डॉ सिंगल म्हणाले, शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी टीमवर्क ने काम करणार आहे. त्यासाठी मे आणि माझे सहकारी सर्वोतोपरी काम करू. सकारात्मक तेने प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊन ती व्यवस्थित करण्यावर आमचा भर राहील.
सिंगल म्हणाले, गुन्हेगारीला आळा व गुंडांवर अंकुश ठेवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू.

ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य राहणार असून, गुन्हेगारी नियंत्रणासाठी नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. त्यांनाही सोबत घेतल्या जाईल,अशी हमीही सिंगल यांनी दिली. सुंदर व सुरक्षित नागपूरसाठी प्रयत्नरत राहणार असून, हायटेकसह बेसिक पोलिसिंगवरही भर राहील,असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

यावेळी पोलिस सहआयुक्त अस्वती दोरजे. गुन्हेशाखेचे अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, अपर पोलिस आयुक्त प्रमोद शेवाळे, पोलिस उपायुक्त अर्चित चांडक, अनुराग जैन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गुंडगिरी खपवून घेणार नाही! पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगलाचा इशारा, रात्रीच स्वीकारला पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार पदभार
Budget 2024: नागपूर-सेवाग्राम तिसऱ्या रेल्वे लाईनला ८७ कोटी! वर्धा -नागपूर चौथ्या लाइनसह इतर प्रकल्पांना गती मिळणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.