Nilesh Lanke : एमआयडीसीचा कायापालट करणार ;नीलेश लंके

राजकीय लोक नेहमी भाषण देतात, पण प्रत्यक्षात काम काही करत नाहीत. मात्र, मी काम करणारा खासदार आहे. वेळ वाया घालवत नाही, लोकांचे प्रश्‍न मार्गी लावतो. नगरच्या एमआयडीसीचा विकासात्मक कायापालट करणार आहे.
Nilesh Lanke
Nilesh Lankesakal
Updated on

अहमदनगर : राजकीय लोक नेहमी भाषण देतात, पण प्रत्यक्षात काम काही करत नाहीत. मात्र, मी काम करणारा खासदार आहे. वेळ वाया घालवत नाही, लोकांचे प्रश्‍न मार्गी लावतो. नगरच्या एमआयडीसीचा विकासात्मक कायापालट करणार आहे. त्यानंतरच सत्कारास पात्र ठरणार आहे, असे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केले.

एमआयडीसी येथे आमी संघटनेच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक योगिराज गाडे, संजय गारूडकर, संदेश कार्ले, दत्ता जाधव, आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, उपाध्यक्ष महेश इंदानी, राजेंद्र कटारिया, संजय बंदिष्टी, खजिनदार सुमित लोढा, राजेंद्र शुक्रे, रोहन गांधी, सचिन पाठक, सुमित सोनवणे, सतीश गवळी, सुनील कानवडे, समीर पटवर्धन आदी उपस्थित होते.

लंके म्हणाले, पद प्रतिष्ठा ही फक्त मिरविण्यासाठी नसते. सर्व उद्योजकांना सोबत घेऊन नगरच्या एमआयडीसीचा विकास केला जाणार आहे. उद्योजक टिकला, तर बेरोजगारी कमी होणार आहे. नगर दक्षिण मतदार संघात खूप फिरलो अनेकांचे वेगवेगळे प्रश्‍न आहेत. पण सर्वात गंभीर प्रश्‍न सुशिक्षित तरुणांच्या बेरोजगारीचा आहे. हा प्रश्‍न जर सोडवायचा असेल, तर औद्योगिकीकरणाला चालना दिली पाहिजे. एमआयडीसीत लाईट, रस्ता, भूखंडाचे अनेक प्रश्‍न आहेत. ते सोडविण्यासाठी मी तुमच्या सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पाठक यांनी केले. प्रास्ताविक संजय बंदिष्टी यांनी केले. आभार अमोल घोलप यांनी मानले.

मोठ्या कंपन्या आल्या पाहिजेत : खाकाळ

आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी एमआयडीसीत मोठ्या कंपन्या आल्या पाहिजेत. त्यामुळे लघू उद्योजकांना चालना मिळून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आपल्या मागून आलेले सुपा, रांजणगाव, वाळुंज एमआयडीसी सुधारल्या. आमी उद्योजकांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट करून आमी संघटनेची ओळख करून दिली, तर संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेतला व येणाऱ्या अडचणी आणि विविध प्रश्‍न मांडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com