स्वातंत्र्यदिनी राहुरीत चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिसांची रात्रभर शोध मोहिम

crime
crimeEsakal
Updated on

राहुरी (जि. नगर) : स्वातंत्र्यदिनी काल (रविवारी) मध्यरात्री नगर-मनमाड महामार्गावर रस्तालूट करणाऱ्या सात-आठ सशस्त्र चोरट्यांनी धुमाकूळ घातला. राहुरी पोलिस ठाण्यातील ३५ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी नांदगाव ते कोल्हारदरम्यानचा परिसर रात्रभर पिंजून काढला. गुहा येथे पोलिसांच्या वाहनाने चोरट्यांच्या दुचाकीला धक्का दिला. मात्र, दोन दुचाकी सोडून चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

काल (रविवारी) रात्री सव्वादहा वाजता नगर-मनमाड महामार्गावर कृषी विद्यापीठानजीक सिमेन स्टेशनसमोर दुचाकीस्वार अशोक भाऊसाहेब गायकवाड (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) यांना विनाक्रमांकाच्या दुचाकीवरील तीन अज्ञात चोरट्यांनी अडविले. एका चोरट्याने गायकवाड यांच्या गळ्याला धारदार सत्तूर लावला, तर दोघांनी त्यांच्या शर्ट व पँटच्या खिशातून रोख दहा हजार रुपये व पाच हजारांचा मोबाईल लंपास केला. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी रात्रीच्या गस्तीपथकाला सावध केले.

गुहा पाट येथील काही भाविक पिक-अप वाहनातून पंढरपूरहून देवदर्शन करून घरी परतत होते. त्यांचे वाहन गुहा पाटावर आले असता, दोन दुचाकींवरील पाच चोरट्यांच्या टोळीने रात्री बारा वाजता अडविले. शस्त्रांचा धाक दाखवून भाविकांना लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, आसपासचे नागरिक मदतीला धावल्याने चोरट्यांनी पलायन केले.

crime
अ‍ॅमेझॉन रक्षाबंधन सेल : Redmi, OnePlus सह इतर गॅझेट्सवर बंपर ऑफर

दरम्यान, राहुरीचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, सहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंह रजपूत, उपनिरीक्षक नीरज बोकील, उपनिरीक्षक तुषार धाकराव, उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ यांची पथके ३५ पोलिस कर्मचाऱ्यांसह सहा खासगी वाहने, दोन सरकारी वाहने व चार दुचाकींवरून नगर-मनमाड महामार्गावर उतरली. मध्यरात्री एक वाजता गुहा पाट ते गुहादरम्यान उपनिरीक्षक धाकराव यांच्या पथकाने दुचाकीवरील चोरट्यांचा पाठलाग केला.

गुहाहून तांभेरे रस्त्याकडे वळालेल्या चोरांच्या एका दुचाकीला पोलिसांच्या वाहनाने धक्का देऊन पाडले. वाहनातून पोलिस खाली उतरेपर्यंत दोन्ही दुचाकी सोडून पाच चोरट्यांनी अंधारात धूम ठोकली. तेथे पोलिसांनी विनाक्रमांकाची व एक चोरीची, अशा दोन दुचाकी ताब्यात घेतल्या.

ग्रामस्थांनी पिंजून काढला परिसर

गुहातील ग्रामस्थांसह पोलिसांनी परिसर पिंजून काढला. मात्र, चोरट्यांचा शोध लागला नाही. पोलिस व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे रात्री नगर-मनमाड महामार्गावर रस्तालुटीच्या घटना टळल्या.

crime
ऑनलाईन क्लाससाठी बजेटमध्ये डेस्कटॉप कंप्यूटर शोधताय? हे आहेत बेस्ट ऑप्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()