पवारांमुळे कर्जत-जामखेड अॉक्सीजनबाबत स्वयंपूर्ण

Rohit pawar
Rohit pawarE sakal
Updated on
Summary

कुठल्याही परिस्थितीत त्यांनी आपल्या मतदारसंघातील रुग्णांसाठी ऑक्सीजन कमी पडू दिला नाही. दरम्यान दुदैवाने तिसरी लाट आल्यास ऑक्सीजनची कमतरता भासू नये.

कर्जत : कोरोनाच्या दुस-या लाटेत राज्यासह देशात ऑक्सीजन तुटवड्यामुळे सर्वच यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या अडचणीच्या काळात दोन्ही तालुक्यात ऑक्सीजनचा तुटवडा होणार नाही, याची सर्वतोपरी काळजी आमदार रोहित पवार यांनी घेतली.

कुठल्याही परिस्थितीत त्यांनी आपल्या मतदारसंघातील रुग्णांसाठी ऑक्सीजन कमी पडू दिला नाही. दरम्यान दुदैवाने तिसरी लाट आल्यास ऑक्सीजनची कमतरता भासू नये यासाठी पूर्वनियोजन करून आमदार पवार यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून कर्जत तालुक्यात ऑक्सीजननिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाला जिल्हा प्रशासनामार्फत मंजुरी मिळाली आहे. तालुका ऑक्सीजननिर्मितीत आता स्वयंपूर्ण होणार आहे. (Oxygen production in Karjat-Jamkhed due to Rohit Pawar)

Rohit pawar
महाबीज कर्जत-जामखेडमध्ये घेणार उडदाचे बीजोत्पादन

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून वाढते संक्रमण रोखण्यासाठी विविध प्रभावी व नाविन्यपूर्ण उपाययोजना आमदार पवार राबवत आहेत. कर्जत येथे सुसज्ज जम्बो कोव्हीड सेंटर उभारून रुग्णांना चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा पुरवण्यास ते कटिबध्द राहिलेले आहेत. परिणामी कर्जतसह आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्णही या ठिकाणी येऊन उपचार घेत आहेत. रुग्णांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये हाच अट्टहास असलेल्या आ. रोहित पवारांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून आणखी एक मोलाची कामगिरी बजावत कर्जतकरांची मने जिंकली आहेत. त्यांच्या पुढाकारातून कर्जतमध्ये ऑक्सीजननिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे.

दरम्यान भविष्यातील दृष्टीकोनातून कर्जतमध्ये उपचार घेणा-या रुग्णांना मुबलक प्रमाणात ऑक्सीजनचा पुरवठा व्हावा याकरिता कर्जतमध्ये हा ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. याद्वारे कर्जतमध्ये 1200 एलपीएम ऑक्सीजन निर्मिती होणार असून या प्रकल्पातून 250 ऑक्सीजन सिलेंडर प्रति दिवशी भरले जाणार आहेत. हवेतून ऑक्सीजन संकलित करून त्याद्वारे द्रवरुप ऑक्सीजनची निर्मिती या प्रकल्पात होणार आहे.

कर्जत जामखेडसह आजूबाजूच्या करमाळा, परांडा, भूम, दौंड, बीड, कडा व आष्टी या भागातून उपचारासाठी येणा-या रुग्णांचा आवाका लक्षात घेऊन आ. रोहित पवार यांनी सद्यपरिस्थितीत ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी पाठपुरावा केल्याने सर्वच रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.

मुबलक अॉक्सीजन मिळेल

कोरोनाच्या या दुस-या लाटेत ऑक्सीजनच्या कमरतेमुळे सर्वच वैद्यकीय यंत्रणांना ऑक्सीजन मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. येत्या काळात कर्जत व जामखेड तालुक्यासाठी मुबलक प्रमाणात ऑक्सीजनचा पुरवठा व्हावा, या नियोजनातून कर्जत-जामखेडमध्ये ऑक्सीजननिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, अहमदनर जिल्हा प्रशासन व महाविकास आघाडीचे आभार.

- आमदार रोहित पवार,कर्जत-जामखेड. (Oxygen production in Karjat-Jamkhed due to Rohit Pawar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.