Pankaj Lodha : अकरा गुंठे जमीन दान देत वाढदिवस साजरा,सामाजिक कार्यकर्ते पंकज लोढा यांचे दातृत्व

Pankaj Lodha : सामाजिक कार्यकर्ते पंकज लोढा यांनी कोपरगाव येथे स्नेहालय संस्थेला ११ गुंठे जमीन दान केली. वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या चुलते आणि आजींच्या स्मरणार्थ हे दान केले.
Pankaj Lodha donates eleven guntha
Pankaj Lodhasakal
Updated on

शिर्डी : राहाता तालुक्यातील रूई येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज लोढा यांनी नगरच्या स्नेहालय संस्थेला कोपरगाव येथील अकरा गुंठे जमीन दान दिली. काल आपल्या मित्रमंडळाच्या साक्षीने त्यांनी हे दान जाहीर करून आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा केला. या जमिनीची किंमत सुमारे चाळीस लाख रूपये इतकी आहे.

चुलते कै. कांतीलाल लोढा व आजी कै. राजूबाई लोढा यांच्या स्मरणार्थ त्यांनी दान केले. दळणवळणाच्या दृष्टीने सोयीची असल्याने येथे स्नेहालय सेवाभावी उपक्रम सुरू करेल, अशी माहिती स्नेहलयचे विश्वस्त गिरीश कुलकर्णी यांनी दिली.

लोढा म्हणाले, की आपले वडील अशोकलाल लोढा यांना स्नेहालय संस्थेसाठी जमीन देण्याची इच्छा होती. त्यांच्या प्रेरणेतून आपण ही जमीन भेट दिली. आपण स्नेहालय संस्थेच्या कामात शक्य होईल, तेवढा सक्रीय सहभाग घेतो. निराधार, वयोवृध्दांसह समाजातील विविध गरजू समाजघटकांसाठी ही संस्था फार मोठे आणि महत्वाचे काम करते.

संस्थेचे विश्वस्त गिरीश कुलकर्णी यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण या संस्थेच्या कामात सक्रीय झालो. कोपरगाव परिसरात स्नेहालयाचे कार्य सुरू करण्याची कुलकर्णी यांची फार दिवसांपासूनची इच्छा होती. या संस्थेला जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी माझ्या वडीलांची इच्छा होती. त्यामुळे काल हा योग जूळून आला. यावेळी साई कुबेर डेव्हलपर्सचे संजय जाधव, अमोल डेंगळे, बाबासाहेब वाणी मुस्ताक इनामदार, अनिल वाणी, तुषार आहेर, राहुल भारती आदी उपस्थित होते.

आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण ही जमीन स्नेहालय संस्थेस दान दिली. येथे उभ्या राहाणाऱ्या सेवाप्रकल्पास देखील आपण शक्य होईल ते सर्व सहकार्य करणार आहोत.

-उद्योजक पंकज लोढा

कोपरगाव शहराच्या हद्दीत आणि कोपरगाव नगर राष्ट्रीय महामार्गालगत ही अकरा गुंठे जमीन आहे. ही जमीन दान देणारे उद्योजक पंकज लोढा हे स्नेहलयाच्या कामात सक्रीय आहेत.

- गिरीश कुलकर्णी, विश्वस्त स्नेहालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.