Parner Health Centre :तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालयांसह सात प्राथमिक आरोग्य केंद्र व ४१ उपकेंद्र आहेत. मात्र, तालुका आरोग्य अधिकाऱ्यासह अनेक दवाखान्यांतील आरोग्य अधिकाऱ्यांसह विविध पदे रिक्त असल्याने आरोग्य विभागालाच सलाईन देण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील अळकुटी प्राथमिक आरोग्य केंद्रत आरोग्य अधिकाऱ्यांची दोन पदे असून ती गेली अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत असल्याने आर्थिक फटका बसत आहे.
तालुक्यात गेली सुमारे वर्षभरापासून तालुका आरोग्य अधिकारी हे पदी प्रभारी अधिकारी आहेत. तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्याकडे हा पदभार सोपविण्यात आला आहे, तसेच अळकुटी प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन खडकवाडी व नांदूर पठार या दोनही प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी एक आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
या शिवाय इतरही आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने आरोग्य विभागाची स्थिती गंभीर झाली आहे. आरोग्य सेविका हा आरोग्य विभागाचा कणा आहे. मात्र, तालुक्यात ४९ आरोग्य सेविकांची पदे मंजूर असताना २३ आरोग्य सेविकांची पदे रिक्त आहेत, तसेच ४२ आरोग्य सेवकांपैकी १२ आरोग्य सेवकांची पदेही रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्यविषयक माहिती संकलनात मोठी अडचण येत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे पुढीलप्रमाणे
पदाची नावे मंजूर पदे रिक्त पदे
तालुका वैद्यकीय अधिकारी १ (१)
समुदाय आरोग्य अधिकारी ३७ (४)
आरोग्य सेवक ४२ (१२)
आरोग्य सेविका ४९ (२३)
आशा वर्कर २२२ -
हे आहेत संपावर
सध्या सर्व आशा वर्कर व समुदाय आरोग्य अधिकारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी गेली काही दिवसांपासून संपावर आहेत. यात २२२ अशा वर्कर व ३७ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पारनेर तालुका विस्ताराने खूप मोठा आहे. लोकसंख्या खूप आहे. सर्व रुग्णांना चांगली सेवा देत आहे. आहे त्या मनुष्यबळावर जनतेला चांगली सेवा देत आहोत.- सुदाम बगल, तालुका आरोग्य अधिकारी, पारनेर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.