पुलांमुळे पाथर्डी-शेवगाव आले जवळ

अमरापूर-भातकुडगाव हे अंतर कमी होऊन शेवगाव-पाथर्डी हे दोन्ही तालुके जवळच्या मार्गाने दक्षिणोत्तर जोडण्यास मदत होणार आहे.
 पाथर्डी-शेवगाव पुल
पाथर्डी-शेवगाव पुलsakal
Updated on

अमरापूर : शहांजापूर (ता. शेवगाव) येथील सकुळा नदीवर व सामनगाव येथील डोमेश्वर नाल्यावर नवीन पुलाच्या उभारणीस मंजुरी मिळाल्याने, अमरापूर-भातकुडगाव हे अंतर कमी होऊन शेवगाव-पाथर्डी हे दोन्ही तालुके जवळच्या मार्गाने दक्षिणोत्तर जोडण्यास मदत होणार आहे.भातकुडगाव- सामनगाव- शहांजापूर- अमरापूर या १५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण ‘नाबार्ड’च्या अर्थसाह्याने दोन-तीन टप्प्यांत पूर्ण झाले आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातून सामनगाव येथील ढोरा नदीवर तब्बल दोन कोटी ६७ लाख रुपये खर्चून मोठ्या पुलाचे कामदेखील या वर्षी पूर्ण झाले आहे.

 पाथर्डी-शेवगाव पुल
'पटवर्धन'च्या संचालकांचे जामीन अर्ज फेटाळले

त्यामुळे शहरटाकळी, दहिगाव, भातकुडगाव हा शेवगाव तालुक्याचा उत्तर भाग व नेवासे तालुका अमरापूरमार्गे पुढे पाथर्डीला जवळच्या मार्गाने जोडला गेला आहे. शेवगावमार्गे रहदारीच्या रस्त्यावरील जवळपास वीस किलोमीटर वळसा वाचत असल्याने, या मार्गाने रहदारीदेखील वाढू लागली आहे. ऊसवाहतूक व इतर वाहतुकीसाठी हा रस्ता जवळचा असल्याने, यास प्राधान्य दिले जात आहे. मात्र, या रस्त्यावरील सामनगाव येथील खेडकर वस्तीनजीक डोमेश्वर नाल्यावर व शहांजापूर येथील सकुळा नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात मोठी गैरसोय होत होती. शिवाय, पुलाअभावी मोठ्या वाहनांना ये-जा करता येत नव्हती.

या दोन्ही पुलांसाठी आमदार राजळे यांनी ‘नाबार्ड’च्या माध्यमातून तब्बल ९६ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याअंतर्गत डोमेश्वर येथील ६७ लाख रुपये व सकुळा नदीवरील २९ लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुलांच्या कामास नुकताच प्रारंभ करण्यात आला.

 पाथर्डी-शेवगाव पुल
बालिकाश्रम रस्ता परिसरातही एलईडी

यावेळी आमदार राजळे, बापूसाहेब पाटेकर, ताराचंद लोढे, माजी सभापती संदीप सातपुते, विजय कापरे, शिवाजी भिसे, उमेश भालसिंग, भीमराज सागडे, संजय खरड, बाळासाहेब मरकड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर अमरापूर-भातकुडगाव हा रस्ता वाहतुकीसाठी सुसाट होऊन वाहनचालकांना सोयीस्कर होणार आहे.

मतदारसंघातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झालेली असतानादेखील राज्यातील आघाडी सरकारमुळे निधी मिळण्यास अडचणी येत आहेत. मात्र, तरीदेखील रस्ते व पुलांसाठी निधी मिळवून, रखडलेली कामे टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

- आमदार मोनिका राजळे, शेवगाव-पाथर्डी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()