पाथर्डी तिहेरी हत्याकांड; शस्त्रासह झालेल्या युक्तीवादात काय काय घडलं?

Pathardi murder crime
Pathardi murder crime SAKAL
Updated on

अहमदनगर : जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील संजय, जयश्री आणि सुनील जाधव या एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाली होती. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यर्लागड्डा यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. हत्याकांडासाठी वापरलेली शस्त्र, घटनास्थळ पंचनामे, सहाय्यक तपासी अधिकाऱ्यांचे पंचनामे आणि डॉक्‍टरांच्या साक्षीच्या अनुषंगाने युक्‍तीवाद करण्यात आला. (Pathardi Murder)

Pathardi murder crime
नगरपंचायत निवडणूक: भाजप अव्वल, पाहा इतर पक्षांचं बलाबल?

जवखेडे खालसा येथे संजय (वय 42), जयश्री (38) या दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा सुनील (वय 19) सह संपूर्ण कुटुंबाची दिवाळीच्या सणाच्या वेळेस ता. 20 ऑक्‍टोंबर 2014 रोजी हत्या झाली होती. दलित कुटुंबातील सर्व सदस्यांची हत्या झाल्याने हे प्रकरण राज्यभर गाजले होते.

या खटल्यात 53 साक्षीदारांच्या साक्षी सरकारी पक्षाच्या वतीने नोंदविण्यात आल्या आहेत. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी खटल्याच्या अंतिम युक्‍तीवादास मंगळवारी (ता.18) सुरूवात केली. या खटल्यातील साक्षीदारांपैकी सात साक्षीदारांच्या मुख्य सरतपासणी, उलट तपासणी, घटनास्थळाचे पंचनामे हे कसे शाबित होता, हे निवेदन त्यांनी पहिल्या दिवशी केले.

Pathardi murder crime
अपहरणकर्ता डुग्गुला सोडून कसा पळाला? व्हिडीओ Viral

या गुन्ह्याचे तपासी अधिकारी डॉ. शरद बोर्डे यांनी केलेले पंचनामे, घटनास्थळी लाकडी काठी, बॅटरी, मयत संजयची राजदूत, कपडे आदी अनुषंगाने सरतपासणी आणि उलट तपासणीवर युक्‍तीवाद करण्यात आला. कुऱ्हाड, कोयता, करवत, लाकडी काठी, खोऱ्या या शस्त्रांच्या सहाय्याने मयतास जखम होऊ शकते किंवा कसे याबाबत तज्ञ साक्षीदार डॉ. हर्षद ठुबे यांच्या दाखल्याच्या आधारे युक्‍तीवाद करण्यात आला.

सलग चार दिवस सुनावणी

प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीशांनी या खटल्याची सलग चार दिवस सुनावणी ठेवली आहे. गुरूवार (ता.20) आणि शुक्रवार (ता.21) रोजी सुनावणी होणार आहे. या खटल्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.