अहमदनगर : महावितरणच्या वीजजोड तोडण्याच्या मोहिमेचा जनतेकडून निषेध

अकोले, राजूरमध्ये कडकडीत ‘बंद’
People protest against MSEDCL
People protest against MSEDCLsakal
Updated on

अकोले :  महावितरणने थकीत वीजबिल वसुलीसाठी वीजजोड तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. २७) माजी आमदार वैभव पिचड यांनी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. आज (शुक्रवारी) अकोले व राजूरमध्ये ‘बंद’ पाळण्यात आला. त्यास नागरिकांनी प्रतिसाद दिला.

People protest against MSEDCL
SC/ST चे पदोन्नतीमधील आरक्षण : डेटा गोळा करण्याची जबाबदारी राज्यांची

महावितरणकडून थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी वीजजोड तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वसुलीसाठी तालुक्यातील जवळपास ५५० रोहित्रे बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. याच्या निषेधार्थ पिचड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी महावितरणवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्या मांडल्या. मात्र, त्या मान्य न झाल्याने पिचड यांनी ‘अकोले बंद’चे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली.

People protest against MSEDCL
अहमदनगर : वाइनबाबत निर्णय शेतकरी हिताचाच; दिलीप वळसे

महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, जालिंदर वाकचौरे, शिवाजी धुमाळ, कैलास वाकचौरे, यशवंत आभाळे, गिरजाजी जाधव, जे. डी. आंबरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.