Peregrine falcon Bird : घाटघर परिसरात देव ससाणा; शिकारी पक्षी म्हणून ओळख, किशोर जोशी यांची माहिती

हिमालयातही तो समुद्रसपाटीपासून २५०० मीटर उंचीपर्यंत आढळतो.
Peregrine falcon Bird
Peregrine falcon BirdSakal
Updated on

- शांताराम काळे

अकोले : घाटघर, पानघार परिसरात दलदल ससाणा किंवा देव ससाणा, असा वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा शिकारी पक्षी आढळला असून, मे महिन्याच्या सुटीत पक्षी प्रेमी व अभ्यासक येथे आले असताना, त्यांनी निरीक्षण करून या शिकारी पक्षाचा शोध लावला. हे ससाणा पक्षी दोन प्रकारचे असून, एक दलदल ससाणा व दुसरा देव ससाणा आहे. हा पक्षी शक्यतो समुद्र भागात आढळतो.

‘सकाळ’शी बोलताना किशोर जोशी म्हणाले, ससाणा दोन प्रजातीचे असून, एक जात सतत स्थलांतरित होत असते, तर दुसरी एकाच ठिकाणी वास्तव्यास असते. ही जात आफ्रिका देशात अधिक असून, भारताच्या पश्‍चिमेकडील समुद्र किनारी आढळतो.

हिमालयातही तो समुद्रसपाटीपासून २५०० मीटर उंचीपर्यंत आढळतो. नेपाळ, बांगला देश, पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार या देशांतही हा पक्षी प्रामुख्याने आढळतो. चोच आकडी सारखी आणि काळी असते.

नर व मादी दलदल ससाणा पक्ष्यात फारसा फरक नसतो. मादीचा रंग गडद तपकिरी असतो, तर वजन अधिक असते. प्रजनन काळा अगोदर पाणथळ जागेत हा पक्षी झाडा झुडपात आपले घरटे बनवतो. गवतापासून बनविलेल्या घरट्यात मादी किमान तीन ते आठ अंडे घालते. ३० ते ३५ दिवस अंडी उबविल्यानंतर पिल्ले बाहेर येतात.

महिनाभरात उडण्यास सक्षम होतात. काही वर्षांपूर्वी या पक्ष्यांची संख्या फार कमी झाली होती. विविध रसायने, शिकार, प्रदूषण, प्रजनन वेळी होणारा उपद्रव यामुळे संख्या घटली होती; मात्र अलीकडेही संख्या वाढली असून, तिचे संवर्धन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

अभयारण्य व घाटघर परिसरात हा दलदल ससाणा वास्तव्यास असून, वनविभागाने त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. असेही पक्षी मित्र किशोर जोशी म्हणाले.

तपकिरी पिवळसर रंग

तपकिरी पिवळसर रंगाच्या या ससाण्याचा आकार १७ ते २१ इंच असतो, तर वजन ४०० ते ८०० ग्राम असते. त्याच्या पंखांचा आवाका व आकार ४५ ते ५१ इंच असतो. हा भारदस्त पक्षी असून, अणकुचीदार आकड्यासारखी चोच व पिवळसर भेदक डोळे असतात. हा पक्षी समुद्रावर झेप घेताच पाण्यातील मासे व पक्षी भयभीत होतात आणि पक्ष्यांची पळापळ होते. उडणाऱ्या पक्षांची शिकार करण्यात हा पटाईत आहे. त्यामुळेच त्याला शिकारी पक्षी म्हटले जाते. सरडा, बेडूक, मासे, छोटे पक्षी हे त्याचे प्रमुख अन्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.