शुद्धलेखनासाठी पोलिसदादांना मिळते उठाबशाची शिक्षा, आहे काय हा प्रकार

Police are punished if they do not spell
Police are punished if they do not spell
Updated on

नगर : नागरिकांकडून चुका झाल्यावर पोलिसदादा त्यांना सोडत नाहीत. कायद्याचा बडगा ते उगारतातच. किमान उठाबशा काढण्याची का होईना शिक्षा त्यांच्याकडून केली जाते. परंतु नगरमध्ये हेच पोलिसदादा चुकले की त्यांना उठाबशा काढाव्या लागतात. तेही किरकोळ कारणासाठी.

शासकीय कामात किरकोळ चुकीला शिक्षा होणे, अत्यंत दुर्मिळ असते. किरकोळ चुकीला सहसा शिक्षा होत नाही. शुद्धलेखनाला सरकारी दप्तरी फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे अनेक परिपत्रकांमध्ये चुका आढळतात. परंतु पोलिस दलातील जिल्हा विशेष शाखा मात्र त्यास अपवाद ठरली आहे. इथं किरकोळ चुकीलाही कर्मचाऱ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली जाते. कामात शिस्त यावी, यासाठी ही शिक्षा केली जाते. 

महसूल, जिल्हा परिषद, बांधकाम व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांकडून किरकोळ चुका झाल्यानंतर सहसा त्यांना कोणी शिक्षा करीत नाही वा त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. गंभीर चूक झाल्यास चौकशीला सामोरे जावे लागते. त्यातून कारवाईही होते. मात्र, किरकोळ चुकीसाठी सहसा कारवाई केली जात नाही. मात्र, मोठ्या चुकीचे मूळ हे किरकोळ चूकच असते. पोलिस दलातही किरकोळ चुकीकडे कोणी लक्ष देत नाही. कधी-कधी अशी चूकच मोठे संकट आणते, याची अनेक उदाहरणे आहेत. 

दैनंदिन कामातील किरकोळ चुका टाळण्यासाठी पोलिस दलाच्या जिल्हा विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या चुकींवर पांघरून न घालता वेगळाच फंडा वापरला आहे. जिल्हा विशेष शाखेतून जिल्ह्यातील पोलिस दलाचे नियोजन केले जाते. सर्व पोलिस ठाण्यांशी पत्रव्यवहार केला जातो.

ध चा मा होऊ नये म्हणून

बंदोबस्ताचे नियोजन होते. पोलिस दलात जिल्हा विशेष शाखेची भूमिका महत्त्वाची असते. तेथे दैनंदिन काम करताना, कर्मचाऱ्यांकडून संगणकावर कॉपी पेस्ट, पत्रव्यवहारातील शुद्धलेखनाच्या चुका होतात. अशा चुका टाळण्यासाठी प्रशासनाने शिक्षेचा नवा फंडा शोधला आहे. दैनंदिन कामात किरकोळ चुका झाल्यास, कर्मचाऱ्यास 50 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली जाते. त्याचा फोटो काढून वरिष्ठांपर्यंत जातो. आतापर्यंत जिल्हा विशेष शाखेतील अनेक कर्मचाऱ्यांना ही शिक्षा दिली गेली आहे. 

"स्मार्ट' काम होण्यासाठीच! 
डिजीटलच्या जमान्यात "स्मार्ट' काम व्हावे, यासाठी कर्मचारी संगणकावर काम करतात. त्यातूनच कॉपी पेस्टसारखे प्रकार होतात. कधी-कधी हा प्रकार अंगलट येतो. त्यामुळे हे काम अधिक "स्मार्ट' व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी शिक्षेचा फंडा अवलंबिला आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.