सावकाराने ओढून नेलेल्या गाडीची चावी घेताना मालकाचे पाणावले डोळे

scorpio
scorpioesakal
Updated on

कर्जत (जि. अहमदनगर) : व्याजापोटी दुरगाव येथील विटभट्टी चालकाची चारचाकी (स्कॉर्पिओ) सावकाराने बळजबरीने ओढून नेल्याची घटना घडली होती. सदर गाडी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व पोलिसांनी सावकाराकडून जप्त करत ती संबंधित तक्रारदाराच्या ताब्यात दिली आहे. ती चावी घेताना गाडी मालकाला गहिवरून येत डोळे पाणावले होते.

मोठ्या रक्कमा देऊनही सावकाराची भुक भागेना

या बाबत वृत्त असे की तालुक्यातील दूरगाव येथील आजीम नशिर शेख यांनी ता.३ एप्रिल २०१५ रोजी विटभट्टी व्यवसायासाठी गावातील खाजगी सावकाराकडून ५ लाख रुपये ६ रुपये टक्के व्याजदराने घेतले होते. त्यानंतर पुढील वर्षी व्याजापोटी ता.३ एप्रिल २०१६ रोजी १ लाख पन्नास हजार सावकाराला दिले. त्यानंतर ता.३ एप्रिल २०१७ रोजी ५ लाख मुद्दल व १ लाख व्याज असे एकूण ६ लाख रुपये सावकाराच्या बँक खात्यावर आर.टी.जी.एस केले होते. एवढी रक्कम देऊनही 'तुमच्याकडे अजुन ४ लाख ७० हजार रुपये व्याज शिल्लक राहिले आहे' असे सावकाराने सांगितले. ही रक्कम आत्ता लगेच दिली नाही तर या एकमेवर ६ टक्के दराने व्याज आकारले जाईल असेही सांगितले. त्यानंतर २ वर्षांनी तक्रारदार शेख यांनी ता.३ एप्रिल २०१९ रोजी सावकाराला ४ लाख ७० हजार रुपये दिले होते. एवढी मोठी रक्कम देऊनही सावकाराची भुक भागली नाही.

scorpio
एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या वेदनादायी : बबनराव पाचपुते

तुमची स्कॉर्पिओ आम्ही घेऊन जातोय - सावकार

'तुमच्या व्याजाचे व्याज ५ लाख ४५ हजार २०० रु.शिल्लक राहिले असून तुम्हाला आमचे पुर्ण पैसे देता येत नाहीत व तुम्ही आमचे व्याजाचे पैसे परत करू शकत नाही. तुमच्याकडे किती वेळा हेलपाटे मारायचे? तुमची एम.एच १४ जी एच २२०६ ही स्कॉर्पिओ गाडी आम्ही घेऊन जात आहे. जोपर्यंत तुम्ही व्याजाचे संपुर्ण पैसे देत नाही तोपर्यंत ही गाडी आमच्याकडेच राहील असे म्हणत सप्टेंबर २०२० रोजी ही गाडी सावकारांनी बळजबरीने ओढून नेली होती. 'मी आज ना उद्या तुमचे पैसे देईन पण माझी गाडी ओढून नेऊ नका अशी तक्रारदाराने दोघांनाही विनंती केली होती. त्यानंतर वेळोवेळी गाडी माघारी मागितली पण 'आता ५ लाख ४५ हजार २०० रुपयांचे १० लाख रुपये झाले आहेत, तुम्ही आता १० लाख द्या मग काय ते पाहू' असेच सांगण्यात येत होते.

scorpio
गुन्हा मागे घेण्यास नकार देणाराचा खून; एकास जन्मठेप

तक्रारदाराने मानले आभार पालिसांचे आभार

विशेष म्हणजे ही गाडी आजतागायत सावकाराच्याच ताब्यात होती. त्यानंतर या खाजगी सावकारांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्जत पालिसांमुळे ही गाडी आता तक्रारदार आजीम शेख यांना मिळाली असुन त्यांनी आभार मानले आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, भगवान शिरसाट, पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते, भाऊ काळे, गणेश भागडे, संपत शिंदे, मनोज लातूरकर यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()