आमचं नाक दाबलं तर तुमचं तोंड दाबू, जगतापांचा पुणेकरांना इशारा

कुकडीचे पाणी पेटले, आवर्तनाला स्थगित दिल्याने वातावरण तापले
Rahul jagtap
Rahul jagtapE sakal
Updated on

श्रीगोंदे : कुकडीच्या डाव्या कालव्यातून ठरलेले शेतीचे आवर्तन सोडण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. सरकारही त्याबाबत सकारात्मक आहे. मात्र, पिंपळगाव जोगे धरणातील पाण्यावर न्यायालयाने स्थगिती दिल्याने अडचणीत भर पडली आहे. मात्र, आम्हाला जर पाणी मिळाले नाही तर पुणे जिल्ह्यातील एकाही बंधाऱ्यात पाणी सोडू देणार नाही, त्यासाठी वाट्टेल तो संघर्ष करण्याची तयारी असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार राहूल जगताप यांनी दिला.(Politics among the leaders of Nagar-Pune district from Kukdi water)

Rahul jagtap
खुंटेफळमध्ये मुलाची गळा चिरून हत्या, गाव हादरले

जगताप यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुणे जिल्ह्यातील बंधाऱ्यात सोडले जाणाऱ्या बेकायदा पाण्याबाबत त्यांनी थेट आक्षेप घेतला आहे. जगताप म्हणाले, न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय उद्या होईल. मात्र, ज्या पध्दतीने जुन्नर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाणी अडविण्याचा प्रयत्न होत आहे तो दुर्देवी आहे.

कुकडीच्या पाण्यात श्रीगोंदेकरांना कायमच संघर्ष करावा लागतोय असे सांगत जगताप म्हणाले, आमच्याकडे सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत सगळेच नियम दाखवून मोकळे होतात. मात्र, आम्ही त्यांच्याकडे काय सुरू आहे याची वाच्यता करीत नाही. या संघर्षाला कंटाळून मी मध्यंतरी पुणे जिल्ह्यातील नद्यांवर असणाऱ्या बंधाऱ्यात टंचाई काळात पाणी सोडले जावू नये यासाठी लवादाकडे याचिका दाखल केली होती.

सदर याचिकेचा निकाल आपल्या बाजूने लागतानाच बंधाऱ्यात पाणी सोडू नये असे आदेश झालेले आहेत. मात्र, तरीही असे पाणी सोडलेच जात आहे. आता आमच्या पाण्यावर जर कुणी टाच आणणार असेल तर आम्हीही त्या बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडू देणार नाही. नगरकरांचे कुणी नाक दाबणार असले तर आम्हीही पुणेकरांचे तोंड दाबू शकतो हे सगळ्यांनीच लक्षात ठेवले पाहिजे.

कुकडीच्या पाण्याबाबत अजूनही सकारात्मक व चर्चेतून मार्ग निघावा यासाठी आपण प्रयत्नशिल असून याप्रश्नी राष्ट्रवादीचे नेते योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे असेही जगताप म्हणाले.(Politics among the leaders of Nagar-Pune district from Kukdi water)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()