राहुरी: कोरोना काळात जनतेचे प्राण वाचवायला जीवाची पर्वा न करता झपाटून काम केले. त्यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले स्वतःचा जीव वाचवायला घरात बसले. त्यांना मागील निवडणुकीत दहा वर्षांच्या निष्क्रिय कारभारामुळे जनतेने नाकारले. त्यांना पुन्हा पराभवाची चाहूल लागल्याने ते सैरभैर झाले आहेत, अशी टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.