राहुरी - राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात विविध प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पुरवणी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
तनपुरे म्हणाले, की मतदारसंघातील महत्त्वाच्या विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मागील पंधरा वर्षांत रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्याबाबत स्थानिक नागरिकांची सातत्याने मागणी होती. त्यानुसार वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांसाठी राहुरी तालुक्यात साडेपाच कोटी, पाथर्डी तालुक्यात नऊ कोटी २० लाख, नगर तालुक्यात १० कोटी ३० लाख, अशा एकूण २५ कोटींच्या निधीची पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद झाली आहे.
तालुकानिहाय मंजूर रस्ते व निधी असा : राहुरी तालुका : प्ररामा ८ ते कोळेवाडी ते रामा ५२ रस्ता (प्रजिमा १८०) किमी ५.३०० ते १०.५०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (२ कोटी रुपये). वांबोरी-कुक्कडवेढे-उंबरे, केंदळ, मानोरी रस्ता (प्रजिमा १५६ ) किमी शून्य ते ७.०० रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (२ कोटी), रामा ५२ ते घोडेगाव, मोरे चिंचोरे, कात्रड रस्ता (प्रजिमा ३५) किमी ११.३०० ते ११.८००, ११.९०० ते १३.९००, १४.४०० ते १४.९०० रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण करणे (१.५० कोटी).
पाथर्डी तालुका : वृद्धेश्वर घाटशिरस, देवराई, त्रिभुवनवाडी, लोहसर, मिरी, आडगाव रस्ता (प्रजिमा १६३) किमी १०.०० ते २०.०० रस्त्याची सुधारणा करणे (२ कोटी). मोहोज ते चिचोंडी रस्ता (प्रजिमा ४५) किमी ३५.०० ते ४१.२०० रस्ता सुधारणा करणे. (१.२० कोटी). खोसपुरी, शिराळ, चिचोंडी, करंजी रस्ता (प्रजिमा ४४) किमी १८.०० ते २२.०० रस्ता सुधारणा करणे. (२ कोटी). वृद्धेश्वर, घाटशिरस, देवराई, त्रिभुवनवाडी, लोहसर, मिरी, आडगाव (प्रजिमा १६३) किमी शून्य ते ५.०० सुधारणा करणे. (२ कोटी), पांढरीचा पूल, मिरी, शेवगाव रस्ता (रामा ५२) किमी २३.०० ते ३३.०० रस्ता सुधारणा करणे. (२ कोटी).
नगर तालुका : नगर, बुऱ्हाणनगर, आगडगाव ते कोल्हार रस्ता (प्रजिमा ४९) सुधारणा करणे. (७ कोटी रुपये). पिंपळगाव माळवी, वडगाव, पिंपळगाव उज्जैनी रस्ता (प्रजिमा १९०) सुधारणा करणे (३.३० कोटी).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.