Radhakrishna Vikhe : पाहुण्यासारखे राहा, भाडेकरू बनू नका; विखेंचा नाव न घेता टोला

विखे पाटील म्हणाले, की मुस्लिम, ख्रिश्चन, गोसावी आणि लिंगायत समाजाकरिता सेवाभावी काम करण्याचे भाग्य मला लाभले.
radhakrishna vikhe patil criticize balasaheb thorat politics ahmednagar
radhakrishna vikhe patil criticize balasaheb thorat politics ahmednagarSakal
Updated on

राहाता : जे आपल्या तालुक्यात पिण्याचे पाणी देऊ शकत नाहीत, त्यांनी इकडे येऊन विकासाच्या गप्पा मारू नयेत. त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. तरीही पाहुणे म्हणून येता तर या. मात्र पाहुण्यासारखे राहा, भाडेकरू बनण्याचा प्रयत्न करू नका, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली.

येथील मुस्लिम, ख्रिश्चन, गोसावी आणि लिंगायत समाजास दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल विखे पाटील यांचा या समाजांतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

कार्यक्रमापूर्वी विविध विकासकामांचे भूमिपूजन, तसेच हुतात्मा अनिलकुमार निकाळे यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे होते.

यावेळी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, मुकुंदराव सदाफळ, अॅड. रघुनाथ बोठे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, माजी नगराध्यक्ष डॉ. के. वाय. गाडेकर, साहेबराव निधाने, मौलाना रऊफ, माजी नगरसेवक सलीम शाह, भाऊसाहेब जेजूरकर, प्रा. निकाळे, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार अमोल मोरे, बांधकाम विभागाचे श्रीनिवास वर्पे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, की मुस्लिम, ख्रिश्चन, गोसावी आणि लिंगायत समाजाकरिता सेवाभावी काम करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांची गेल्या वीस वर्षांपासूनची दफनभूमीच्या जागेची मागणी पूर्ण करता आली. यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची साथ लाभली.

शिर्डी येथे कार्यान्वित झालेले अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय ही उत्तर नगर जिल्ह्याकरिता मोठी उपलब्धी आहे. या कार्यालयाच्या इमारतीसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी लवकरच मंजूर होईल. विकासाचे प्रकल्प काम करून उभे करावे लागतात. केवळ आरोप-प्रत्यारोप करून चालत नाहीत. ज्यांना यापूर्वी महसूलमंत्रिपदाची संधी मिळाली, त्यांना जिल्ह्यासाठी काहीही करता आले नाही.

- राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.