Rohit Pawar : फेरमतमोजणीत भाजप तोंडघशी; कर्जतमध्ये सभापतीपदाचा पेच कायम

Rohit Pawar vs Ram Shinde
Rohit Pawar vs Ram Shindeesakal
Updated on

कर्जत : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालात फेरमतमोजणीनंतरही कोणताही फेरबदल झालेला नसून जैसे थे परिस्थिती राहिल्याने सस्पेस वाढला आहे. फेरमतमोजणीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या गटाच्या प्रत्येकी नऊ जागा कायम राहिल्या आहेत.

Rohit Pawar vs Ram Shinde
Mumbai News : महारेराचा दणका! ११ विकासकांकडून केली साडेआठ कोटींची वसुली

त्यामुळे सभापती आणि उपसभापती कोणाचा होणार, याकडे लक्ष लागले आहे. फेरमतमोजणी करून भाजपचा गट तोंडघशी पडल्याची चर्चा सुरू आहे.

फेरमतमोजणीमध्ये ग्रामपंचायत गटातील.सुवर्णा.कळस्कर यांचे एक मत कमी झाले आहे, तर सर्वसाधारण मतदारसंघातील गुलाब तनपुरे आणि संग्राम पाटील यांचे प्रत्येकी एक मत वाढले आहे. त्यापलीकडे जागांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आता कर्जत तालुक्याचे लक्ष सभापती आणि उपसभापती निवडीकडे लागले आहे.

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांचे समर्थक आमने सामने आले होते. बाजार समितीची निवडणूक राज्यात गाजली होती.

आमदार पवार आणि आमदार शिंदे यांच्या पॅनेलला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या.मात्र, अवघ्या दोन मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांना व पक्षश्रेष्ठींना पराभव जिव्हारी लागला होते. आमदार राम शिंदे पॅनेलच्या कृषी पतसंस्था मतदार संघातील सर्वसाधारण गटातील उमेदवार भरत पावणे आणि महिला राखीव गटातील लीलावती जामदार यांनी निकालाला आव्हान देत फेरमतमोजणीची मागणी केली होती.

Rohit Pawar vs Ram Shinde
Video : 'मी काय खाते-पिते याकडे इंदापूरमधले पुरुष लक्ष ठेवून', सुप्रिया सुळे करणार अमित शाहांकडे तक्रार|Supriya Sule

नगर जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांच्या समोर वादी-प्रतिवादी यांच्यात युक्तिवाद होत सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुखदेव सूर्यवंशी यांच्यासह उमेदवारांच्या साक्षी झाल्या.त्यानंतर जिल्हा उपनिबंधक श्री पुरी यांनी कृषी पतसंस्था मतदार संघातील सर्वसाधारण गटातील एक व महिला राखीव गटातील एक आशा दोन जागासाठीही फेर मतमोजणी करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार प्रत्येकी ५० हजार रुपये शुल्क भरून आज फेरमतमोजणी झाली. मात्र, निकालात कोणताही बदल झालेला नाही.

तालुक्याच्या इतिहासात प्रथमच बाजार समितीच्या निवडणुकीत फेरमतमोजणी झाली.ही फेरमतमोजणी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मॅरेथॉन साडे सहा तास चालली. प्रत्येक मतपत्रिका उमेदवारांच्या प्रतिनिधीला दाखवीत त्याचे चित्रीकरण केले गेले.यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रचंड मानसिक तणाव होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.