Rahuri Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, राहुरी पोलिस ठाण्यात तरुणाविरुध्द गुन्हा दाखल

तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.
Rahuri Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, राहुरी पोलिस ठाण्यात तरुणाविरुध्द गुन्हा दाखल
Updated on

Rahuri Crime against Woman : तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध अपहरणासह अत्याचाराचा व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शुभम राजेंद्र सत्रे (रा. देवळाली प्रवरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन पीडितेने फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. शनिवारी (ता. २०) सकाळी अकरा वाजता महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभी होते. तेथे आरोपी शुभम सत्रे आला. त्याने माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण पळून जाऊन लग्न करू, असे सांगून दुचाकीवर गुहा येथील हॉटेल मैत्री येथे नेले.

तेथे तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी देऊन जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर अहमदनगर येथे नेले. तेथून चारचाकी वाहनातून अहमदनगर ते बीड रस्त्यावर असलेल्या एका गावात नेऊन एका रुममध्ये ठेवले. रविवारी (ता. २१) पहाटे अडीच वाजता आरोपीचे चुलत आजोबा आले. त्यांना पाहून आरोपीने पळ काढला. आरोपीच्या चुलत आजोबांनी घरी आणून सोडले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान फडोळ करीत आहेत. (Latest Marathi News)

Rahuri Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, राहुरी पोलिस ठाण्यात तरुणाविरुध्द गुन्हा दाखल
Mamata Banerjee Accident : ममता बॅनर्जी अपघातात जखमी; नेमकं काय घडलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.