श्रीगोंदे : केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तळागाळापर्यंत पोहोचवून लोकसंपर्क वाढवला, तर येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला निश्चितच घवघवीत यश मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले. श्रीगोंदे येथे भाजपच्या श्रीगोंदे - नगर विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.