अकोले (जि.अहमदनगर) : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी काल (ता.९) राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी नाश्ता करताना आठवले यांनी पिचड यांच्या कानाजवळ जात, काहीतरी म्हणाले...त्यावरून राजकीय चर्चेला उधाण आले होते. आठवलेंनी पिचडांच्या कानात नेमके काय सांगितले?
आठवलेंनी पिचडांच्या कानात नेमके काय सांगितले?
रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी काल (ता.९) राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी नाश्ता करताना आठवले यांनी पिचड यांच्या कानाजवळ जात, भाजपकडून राज्यात काही पद मिळाले का, असे विचारले. त्यावर पिचड म्हणाले, की माझे आता वय झाले. पक्षाने वैभवला आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी राष्ट्रीय मंत्रिपद दिले आहे. माझ्या मुलाचा सन्मान म्हणजे माझा सन्मान. मात्र, तालुक्याच्या प्रश्नासाठी राष्ट्रीय व राज्य पातळीवर निश्चित आवाज उठवू,
वेळ पडली, तर न्यायालयात जाऊ
आठवले व पिचड यांनी यावेळी कौटुंबिक, राज्याच्या व देशाच्या राजकारणावर चर्चा केली. यावेळी पिचड म्हणाले, शेत जमिनी आदिवासींच्या मालकीची असताना इतर हक्कात टाकणार असतील, तर रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे. या वयात आपण सामाजिक न्याय देण्यासाठी वेळ पडली, तर न्यायालयात जाऊ. आपणही मागासवर्गीयांच्या प्रश्नांसाठी बोलवा, मदतीस आपण तयार आहोत. आदिवासी आरक्षणाबाबत सत्तेत असतानाही माघार घेतली नाही. ज्या क्रांतिवीर राघोजी भांगरे यांनी इंग्रज राजवटीला जेरीस आणले, त्यांचे नाव विल्सन डॅमला द्यावे, ही राज्यातील आदिवासी जनतेची माफक अपेक्षा आहे, असेही त म्हणाले.
केंद्रीय पातळीवरील प्रश्न मला सांगा,
एकदा दिल्ली दरबारी येण्याचे आठवले यांनी पिचड यांना निमंत्रण दिले, तर आदिवासी समाजाचे केंद्रीय पातळीवरील प्रश्न मला सांगा, मी पाठपुरावा निश्चित करेल. तुमचे राज्य मंत्रिमंडळातील काम अविस्मरणीय होते. राज्यातील आदिवासींच्या विकासात तुमचा सिंहाचा वाटा आहे, हे मी जवळून पाहिले, असे आठवले म्हणाले. भेटीनंतर आठवले यांनी अकोलेकडे प्रयाण केले.
पराभवाने खचायचे नसते
वैभवला सांगा, पराभवाने खचायचे नसते, उलट उभारी घेऊन काम करायचे असते. पद येते-जाते त्यालाच लोकशाही म्हणायचं. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेणारे आहे. तालुक्यात माझा पक्ष तुमच्यासोबत आहे, असे ठोस आश्वासन मंत्री रामदास आठवले यांनी मधुकर पिचड यांना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.