कोठेवाडीतील भय काही संपेना! गावाला सशस्त्र पोलिस बंदोबस्त

पोलिस
पोलिस sakal
Updated on

पाथर्डी (जि. नगर) : काळरात्रीला वीस वर्षे उलटूनही कोठेवाडीकर मनाने भयभीतच आहेत. कोठेवाडी अत्याचार प्रकरणातील बारा आरोपी तुरुंगातून बाहेर येणार असल्यामुळे येथील नागरिकांच्या काळजाचा ठोकाच चुकला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर पोलिस प्रशासनाने या परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

कोठेवाडी प्रकरणातील १२ आरोपींची मोक्का गुन्ह्यातून मुक्तता झालेली आहे. या न्यायालयाच्या निकालाची माहिती गावात पोचताच रहिवासी भयभीत झाले आहेत. दरम्यान, गावातील काही महिला व पुरुषांनी आमदार नीलम गोऱ्हे यांच्या भेटीसाठी थेट पुणे गाठले आहे. १७ जानेवारी २००१ रोजी रात्री बारा ते पंधरा दरोडेखोरांनी कोठेवाडीत रात्रभर धुमाकूळ घालीत अत्याचाराच कळस केला होता. ‘सकाळ’ने हे प्रकरण प्रथम समाजासमोर आणले होते. यातील बारा आरोपींना नगरच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली होती. उच्च न्यायालयातही ती कायम करण्यात आली होती. या सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आला होता. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात संघटित गुन्हेगारीच्या (मोक्का) कलमांना आरोपींमार्फत आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आरोपींची मुक्तता करण्यात आली. हा निकाल गावात समजताच कोठेवाडीकरांच्या काळजाचा ठोकाच चुकला आहे. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वत्र शांतता दिसून येत आहे. सुडाच्या भावाने कोणी गावात येईल का, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात असून, ती अनेकांच्या चेहऱ्यांवर दिसून येत आहे.

न्यायालयाच्या निकालानंतर पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोठेवाडीत सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस चोवीस तास पहारा देतील, नागरीकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे अधिकारी सांगत आहेत.

पोलिस
मुख्यमंत्र्यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे राजकारणात येणार का? भुजबळ म्हणाले..

तो प्रसंग आठवला तर आजही अंगावर शहारे येतात. आरोपी तुरुंगात होते तेव्हा काही वाटत नव्हते. आता चोरी होईल का, अशी भीती वाटते. पोलिस आल्याने धीर वाटतो. तुम्ही सर्व जण आमच्यासोबत असाल, तर जगण्याला बळ मिळेल.

- श्रीधर कोठे, ज्येष्ठ नागरिक कोठेवाडी.

कोठेवाडीतील प्रमुख महिला व पुरुषांचे शिष्टमंडळ आपल्याबरोबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार आहे. मी कोठेवाडीच्या महिला व ग्रामस्थांसोबत आहे. कोणीही भिण्याचे कारण नाही. सरकार आपल्यासोबत राहील.

- नीलम गोऱ्हे, आमदार, शिवसेना

पोलिस
"आदित्य ठाकरे भविष्यात राज्याचे नेतृत्व करतील!"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.