अहमदनगर : तिसऱ्या लाटेच्या धास्तीने निर्बंध?

जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; जिल्हा प्रशासन झाले सज्ज
ahmednagar collector
ahmednagar collectorsakal
Updated on

अहमदनगर : कोरोनाच्या संभाव्‍य तिसऱ्या लाटेच्‍या(corona third wave) पार्श्‍वभूमीवर जिल्‍हा प्रशासनातर्फे करण्‍यात आलेल्‍या उपाययोजनांचा आढावा जिल्‍हाधिकाऱ्यांकडून (ahmednagar collector)तालुकानिहाय घेतला जात आहे. तसेच आरोग्य विभागही गावागावांत लसीकरण मोहिमे राबवित आहे. जिल्ह्यात सध्या शासकीय रुग्णालयात १३४ व्हेंटिलेटर(ventilator) कार्यान्वित असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या(ahmednagar district hospital) सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन संभाव्य तिसऱ्या लाटेचा शक्यता गृहित धरून काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले तालुकानिहाय घेत आहेत. तसेच असतील त्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना देत आहेत.

ahmednagar collector
अहमदनगर महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज

या दौऱ्यात तालुक्‍यातील कोविड सेंटरची संख्‍या वाढविण्‍याबाबत व त्‍यातील सोयी सुविधांचे नियोजन करावे, कोविड सेंटरमध्‍ये औषधे, ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्‍ध करून ठेवावा, या सर्व कामांच्‍या नि‍रीक्षणासाठी निरीक्षण म्‍हणून एका अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, तसेच लसीकरण वाढविण्‍यासाठी स्‍थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षक यांना लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घ्‍यावे. जास्‍तीत-जास्‍त लसीकरण व चाचण्‍या कशा होतील, याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना दिल्या जात आहेत.दुसऱ्या लाटेच्या वेळी रुग्णांना बेडची उपलब्ध होत नव्हते. तशी परिस्थिती उदभवू नये, यासाठी तालुका स्तरावर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात सध्या जिल्हा रुग्णालयांसह उपरुग्णालय व ग्रामीण रुगणालयाचे मिळून एकूण १३४ व्हेंटिलेटर बेड आहेत. तसेच जिल्ह्यात खासगी व्हेंटिलेटर बेड असून, सर्व बेड सज्ज ठेवण्यात आलेले आहेत.

ahmednagar collector
अहमदनगर : घर कागदावरच; प्रतिसादाअभावी योजनाच उघड्यावर

जळालेल्या व्हेंटिलेटरचा तिढा कायम

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत खराब झालेल्या व्हेंटिलेटरचे पंचनामे झाले नसल्याची चर्चा आहे. या घटनेचा पंचनामा झालेला असून, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने व्हेंटिलेटर वापरात आणण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया करून पुढील कारवाई होणार आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ग्रामीण भागात नागरिकांची आरोग्य तपासणी व लसीकरणाच्या कामाबरोबरच दैनंदिन रुग्णांना औषधोपचार प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रातून सुरू आहे. तसेच मुलांचे लसीकरणही सुरू असून, कोरोना जनजागृतीचे कामही कर्मचारी करीत आहेत.

डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्यधिकारी.

नेवासे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाने तालुका प्रशासनाने तालुक्यात तपासणी व लसीकरणावर भर दिला आहे. दुसऱ्या लाटेत भेडसावलेल्या ऑक्सिजन प्रश्नी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाखांनी दाखल घेत नेवासे फाटा व शनी शिंगणापूर असे दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्येरत केली. याव्यतिरिक्त तालुक्यात वडाळा मिशन संस्थेचा व चिलेखनवाडी असे दोन ऑक्सिजन प्रकल्प देखील सुरू आहेत. ७७ टक्के नागरिकांनी पहिला, तर ४३ टक्के नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. कोविड केअर सेंटरमध्ये सहाशे बेड उपलब्ध करूनदिले आहेत.

ahmednagar collector
नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या विरोधात धडक कारवाई

अकोले

अकोले तालुक्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रसासन सज्ज झाले आहे. तहसीलदार सतीश थेटे, तालुका आरोग्याधिकारी श्‍यामकांत शेटे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

राहुरी

तालुक्यात कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. त्यात ५७० बेडची व्यवस्था केल्याची माहिती तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिली. घरोघरी जाऊन लसीकरण न झालेल्या नागरिकांचा शोध घेतला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.